खोटे व बनावट संमतीपत्र तयार केल्या प्रकरणी निर्दोष मुक्तता
आरोपी क्र. 1 व 3 तर्फे ऍड. राजेंद्र रावराणे आणि प्राजक्ता गावकर
आरोपी क्र.2 ते 4 तर्फे ऍड. उल्हास कुलकर्णी यांचा युक्तिवाद
कणकवली : मुंबई येथील नोटरी पब्लिक यांचे समोर खोटे व बनावट हमीपत्र, संमतीपत्र तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी सुहास उर्फ श्रीकृष्ण हनुमंत नाईक मालवणकर यांच्यासह चौघांची सबळ पुराव्याअभावी मालवणचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी महेश देवकाते यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी आरोपींच्या वतीने ऍड. राजेंद्र रावराणे, ऍड. प्राजक्ता गावकर आणी अॅड उल्हास कुलकर्णी यांनी काम पाहिले.
या बाबत अधिकत हकीकत अशी, कणकवली येथिल निवृत्त तहसीलदार भिकाजी हनुमंत नाईक मालवणकर यांनी मालवण कुंभारमाठ येथील त्यांच्या जमिनी बाबत त्यांचे खोटे संमतीपत्र आणि हमीपत्र तयार केले, तसेच त्यांच्या कुंभारमाठ, ता. मालवण येथे असलेल्या जमिनीत असलेल्या विहिरीवर पंपासाठी परस्पर फसवणूक करून वीज कनेक्शन घेतलेबाबत सुहास उर्फ हनुमंत श्रीकृष्ण नाईक मालवणकर, हनुमंत सिताराम नाईक मालवणकर, पृथ्वीराज सिताराम नाईक मालवणकर, अनिल सिताराम नाईक मालवणकर आणि सुनील सिताराम नाईक मालवणकर यांच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात दि. ५/१०/२०१० रोजी फिर्याद दिली होती. या पाच जणांवर मालवण पोलीस ठाण्यात भा द वी कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१ सह कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. व सर्व आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात पाठविण्यात आले होते. याप्रकरणी मालवण न्यायालयात खटला चालला. दरम्यान क्रमांक ५ चे आरोपी सुनील सीताराम नाईक मालवणकर यांचे केस सुरू असतानाच निधन झाले. आरोपीचे वकील यांनी तपासातील अनेक त्रुटीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यावरून आरोपी क्रमांक १ ते ४ यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मालवण महेश देवकाते यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
कणकवली, प्रतिनिधी