उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या बैठकीतील सूचनांची दिलीप बिल्डकॉनकडून तात्काळ दाखल

नगरसेवक संकेत नाईक यांच्या सूचनेनंतर तात्काळ शहरातील महामार्गाच्या सर्विस रस्त्याच्या सफाईचे काम सुरू
कणकवली शहरातील सर्व्हिस रोडवर साचलेला कचरा, माती व अस्वच्छतेमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत नगरसेवक संकेत नाईक यांच्या पुढाकारातून ठेकेदार कंपनी च्या माध्यमातून सर्व्हिस रोडची व्यापक साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या स्वच्छता मोहिमेपूर्वी नगराध्यक्ष संदेश पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत शहरातील स्वच्छता, वाहतूक सुरळीत राहणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व्हिस रोड स्वच्छ ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर तात्काळ कार्यवाही करत सर्व्हिस रोडवरील कचरा उचलणे, माती हटवणे व रस्त्याच्या कडेला असलेली घाण साफ करण्याचे काम सुरू करण्यात आले. श्री. नाईक यांच्या मागणीची तात्काळ दखल घेतल्याने तसेच या उपक्रमामुळे परिसरातील नागरिक व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले असून शहराच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.





