खारेपाटण जि. प. मतदार संघातून ठाकरे सेनेच्या मीनल तळगावकर यांचा उमेदवारी अर्ज वैध

पं. स. मतदारसंघातून ठाकरे सेनेचे रामचंद्र राऊत व कॉग्रेसचे प्रवीण वरुणकर यांचाही उमेदवारी अर्ज वैध

खारेपाटण जि. प. मतदार संघातून शिवसेना (UBT) पक्षाकडून मीनल तळगावकर यांनी आपला जि. प. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज झालेल्या कागदपत्र उमेदवारी अर्ज छाननी मध्ये मीनल तळगावकर यांचा अर्ज वैध ठरला आहे. तसेच पं. स. मतदारसंघातून ठाकरे सेनेचे रामचंद्र राऊत व कॉग्रेस पक्षाचे प्रवीण वरुणकर यांनी ही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रामचंद्र राऊत व प्रवीण वरुणकर यांचे ही उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. पक्षाने ठेवलेल्या विश्वासाचे सार्थक करु व जनतेचा पाठिंबा व प्रेम कायम आमच्या सोबत आहे असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!