विष्णू प्रभू यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प प्रेरणादायक

नेत्रदान, देहदान करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे आवाहन
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात काळसे हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक यांनी मरणोत्तर नेत्रदान करून आदर्श निर्माण केला आहे. मालवण तालुक्यातील काळसे येथील विष्णू प्रभू यांनी जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागाला नेत्रदान करून संकल्प पूर्ण केला. आणि मरणोत्तर नेत्रदान केले. यासाठी डॉ संजय पोळ, डॉ. धीरज शेट्ये, कौस्तुभ देशपांडे, चेतन कोरे यांनी काम बघितले.
नेत्रदान देहदान केल्याने रुग्णांना पुनर्जन्म देणे डॉक्टरांना शक्य झाले आहे. त्यामुळे रक्तदान नेत्रदान देहदान करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.





