अमली पदार्थ, अवैध दारू विरोधात युवासेना आक्रमक

सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली देवगडात मोर्चा पोलीस निरीक्षक व एक्साईज चे दुय्यम निरीक्षक यांना ठणकावले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक त्यांच्या नेतृत्वाखाली अवैद्य दारू धंद्याची विक्री आणि अमली पदार्थ याच्या विरोधात देवगड एक्साईज ऑफिसवर जन आक्रोश…

Read Moreअमली पदार्थ, अवैध दारू विरोधात युवासेना आक्रमक

देवगड तालुक्यातील वानिवडे गावातील उ.बा.ठा चे ग्रामपंचायत सदस्य व अनेक ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांचा वानिवडे गावातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश देवगड तालुक्यातील वानिवडे मधील उबाठाचे कार्यकर्ते रमेश श्रीधर प्रभू ग्राम.प.सदस्य,चेतना महादेव बामणे ग्राम.प.सदस्य, चंद्रकांत बामणे, दत्ताराम कोतेकर,गणपत प्रभु, सुहास प्रभु, संतोष घाडी, सुनिल मुळीक, भालचंद्र बामणे, रविंद्र…

Read Moreदेवगड तालुक्यातील वानिवडे गावातील उ.बा.ठा चे ग्रामपंचायत सदस्य व अनेक ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत सिटी स्कॅन मशीन उपलब्ध

सावंतवाडी(प्रतीनिधी)     सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये सिटीस्कॅन मशीन उपलब्ध झाली असून ही मंजूर करण्यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती ही मशीन  कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्याकडून मंजूर करण्यात…

Read Moreउपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत सिटी स्कॅन मशीन उपलब्ध

कूपरचे डिन डॉ. शैलेश मोहिते आणि सहकाऱ्यांचा” कोकण कट्टा” तर्फे सत्कार

मुंबई (प्रतिनिधी)विलेपार्ले पश्चिम येथील कुपर रुग्णालयात मुंबईतील पहिली मेंदूतील दुर्मिळ डिजिटल सुबट्रक्शन ऍन्जोग्राफी शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या *डीन डॉ शैलेश मोहिते ,* *न्यूरोलॉजिस्ट डॉ प्रद्युम्न ओक ,आणि सहकारी* यांचं मनस्वी अभिनंदन. करण्यासाठी कोकण कट्टा सदस्य कुपर रुग्णालयात मोहिते सरांची सदिच्छा भेट…

Read Moreकूपरचे डिन डॉ. शैलेश मोहिते आणि सहकाऱ्यांचा” कोकण कट्टा” तर्फे सत्कार

शुक्रवारी वैभववाडीत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती

वैभववाडी(प्रतिनिधी) शुक्रवार दिनांक ३१मे२०२४रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती असल्याने त्या दिवशी सकाळी ठिक ९वाजता लक्ष्मण शेळके यांच्या  वैभववाडी येथील निवासस्थानी जयंती साजरी करण्यात येणारआहे. तरी जिल्ह्यातील सर्व अहिल्याबाई होळकर भक्तानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन समाजनेते लक्ष्मण…

Read Moreशुक्रवारी वैभववाडीत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त मसुरे प्रतिनिधीकालावल खाडी गडनदी किनारी मसुरे मर्डे परिसरातील मर्डे, डांगमोडे, कोईल-बांदिवडे येथील अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले एकूण २४ वाळू रॅम्प श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीम. वर्षा झालटे तहसीलदार मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read Moreअनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण : श्रावणी कंप्युटर, अक्षरोत्सव परिवाराचे आयोजनविचारच माणसाला मोठे करू शकतात : प्रणय शेट्ये तळेरे, (प्रतिनिधी)आपण करीत असलेल्या कामामुळे आपली ओळख होणे महत्त्वाचे असून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. विचार माणसाला मोठे करू शकतात आणि तेच…

Read More

एज्युकेशन वर्ल्ड यांच्याकडून घोडावत विद्यापीठास श्रेयांकन

जिल्ह्यात 1 ले,राज्यात 5 वे तर देशात 31 वे स्थान

अतिग्रे/// एज्युकेशन वर्ल्ड या मासिका द्वारे देशभरात उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या
संस्थांना 2024-25 चे श्रेयांकन जाहीर करण्यात आले. यामध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट 300 विद्यापीठातून संजय घोडावत विद्यापीठाने खाजगी विद्यापीठांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम,राज्यात पाचवे तर देशात 31 वे स्थान पटकावले.
      विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी उत्कृष्ट अशा प्रॅक्टिकल लॅब, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिले जाते.तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व कौशल्य वाढीस लागावे यासाठी विविध कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. ज्याचा लाभ विद्यार्थी घेत आहेत. उत्तम प्रशासन,उत्तम शिक्षण,सोयी- सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळेच हे श्रेयांकन देण्यात आल्याची माहिती एज्युकेशन वर्ल्ड यांचेकडून देण्यात आले आहे.
        या पुरस्काराबद्दल बोलताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले,की विद्यापीठाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून पायाभूत सोयी सुविधा वातावरण व कोर्सेसची निर्मिती केली आहे. येथे कार्यरत असणाऱ्या सर्व प्राध्यापक,अधिकारी,कर्मचारी यांच्यामुळे विद्यापीठाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.जागतिक स्तरावर विद्यापीठ नवा रूपाला आणणेचे आमचे प्रयत्न आहेत.
        या श्रेणी बद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, सर्व डीन,प्राध्यापक,प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Read Moreएज्युकेशन वर्ल्ड यांच्याकडून घोडावत विद्यापीठास श्रेयांकन

संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाच्या  दोन  विद्यार्थ्यांची “इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड”  कंपनीमध्ये निवड जयसिंगपूर:(प्रतिनिधी)  शिक्षण क्ष्रेत्रात आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात निर्माण केलेले संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागातील सिव्हील  इंजिनीरिंगच्या आर्यन शिंगे, जयंत दीक्षित या दोन विद्यार्थ्याची ‘इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड’ …

Read More

*⛳ दुण्डागडावरील माहितीफलकांचे अनावरण⛳*
देवगड/चाफेड (प्रतिनिधी)
           देवगड तालुक्यात चाफेड येथील दुण्डागडावर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थांच्यावतीने गडावर जाणाऱ्या वाटेवर तसेच महत्वाच्या वास्तूंच्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावण्यात आले.
          सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक गडकिल्ले आहेत जे काळाच्या ओघात विस्मरणात गेलेले आहेत. अशातीलच एक गड म्हणजे दुण्डागड. या दुण्डागडावर चाफेड ग्रामस्थ व दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत फेब्रुवारीपासून संवर्धन मोहिमांतर्गत गडावरील वास्तूंची स्वच्छता व संवर्धन करण्यात आले. दुण्डागडावर भेट देणाऱ्या दुर्गप्रेमींच्या सोयीसाठी गडावर जाणाऱ्या वाटेवर मार्गदर्शकफलक तसेच महत्वाच्या ठिकाणासाठी नामफलक आवश्यक होते. यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थमार्फत मार्गदर्शक फलक लावण्यात आलेत. यामध्ये गडावर जाणाऱ्या मार्गांवर पाच फलक, घोड्याची पाग, दुर्गाचा चाळा, राजवाडा, विहीर, मुख्य दरवाजा, बुरुज याठिकाणी सहा असे एकूण अकरा फलक यावेळी लावण्यात आले.
          या मोहिमेला चाफेड सरपंच किरण मेस्त्री, महेश परब, साईल पांचाळ, संतोष साळसकर, आकाश राणे, प्रदिप घाडी हे ग्रामस्थ तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक, समिल नाईक, हृदयनाथ गावडे, उत्कर्षा वेंगुर्लेकर, हेमलता जाधव, प्रसाद पेंडूरकर, जालिंदर कदम, वेदांत वेंगुर्लेकर, ऋतुराज सावंत, अक्षय जाधव, प्रविण नाईक आदी उपस्थित होते.
          साईप्रसाद मसगे, उत्कर्षां वेंगुर्लेकर, स्मिता जाधव, सुजल ऍग्रो केअर मार्ट, हेमलता भास्कर जाधव, समीक्षा मोहन माळकर, स्मिता सुनिल कोदले, साक्षी खरात, आरती मकरंद वायंगणकर, विजय सावंत,अभिनव रामचंद्र भिंगारे, संगम श्रीकृष्ण चव्हाण यांनी मार्गदर्शक फालकांसाठी तसेच चाफेड ग्रामपंचायत सरपंच किरण मेस्त्री यांनी फालकांच्या पोलांसाठी तसेच सिमेंट, वाळू, खडी यांच्यासाठी सौजन्य केले. अल्पोपहार व भोजनाची सोय हेमालता जाधव यांनी केली सर्वांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

Read More*⛳ दुण्डागडावरील माहितीफलकांचे अनावरण⛳*

*बुद्धांचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवादच जीवन सुखी बनवेल .*
                विजय चौकेकर
कणकवली( वार्ताहर .)
       तथागत गौतम बुद्धांना मानवजातीला  बुद्धीवादी बनवायचे होते . माणूस बुद्धीवादी म्हणजेच विज्ञानवादी बनल्यास तो स्वतंत्रता पूर्वक सत्याचा शोध लावण्यास सिद्ध होईल . आणि  समाजात ज्या भ्रामक समजूती आहेत त्याचे उगमस्थानच नष्ट करेल . म्हणूनच बुद्धाचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवाद जीवनात आचरला तरच माणूस सुखी होईल . असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले .

पियाळी बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखा पियाळी यांनी पियाळी बौद्धवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC ) सिंधुदुर्ग यांच्या संयुक विद्यमाने आयोजित केलेल्या *अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा* आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रात्यक्षिकासह व्याख्यानात ते बोलत होते .
     यावेळी त्यांच्या सोबत विचार मंचावर पियाळी बौद्ध विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष अशोक कदम , पियाळी बौद्ध विकास मंडळाचे सचिव तेजराम कदम , प्रज्ञा महिला मंडळाच्या अध्यक्षा मनाली कदम , सचिव चिंती कदम , ग्रामिण पियाळी बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख गौतम तांबे ‘ सचिव अंकुश कदम , सुधांश तांबे , राहुल कदम आदी उपस्थित होते .

     विजय चौकेकर यांनी संपूर्ण कायद्याची उपस्थितांना विविध प्रात्यक्षिकासह माहिती करून दिली . जादूटोणा विरोधी कायदा देव आणि धर्माच्या विरोधात नसल्याचे आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे देव आणि धर्माच्या विरोधात कधीच नव्हते तर देव आणि धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या सर्व जाती धर्मातील भोंदू बाबांच्या विरोधातील होते .  असे सांगितले .
पियाळी बौद्ध विकास मंडळ गावशाखेचे  अध्यक्ष गौतम तोबे सर यांनी  विजय चौकेकर यांनी आपल्या शालेय जीवनात अनेक विद्यार्थांना सुसंस्कारित केले तर आता सेवानिवृत्तीचा काळही समाज प्रबोधनासाठी खर्च करीत असून शाळा , विद्यालय , महाविद्यालय आणि गावोगावी जाऊन  अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा या व्याख्यानमालेतून वैज्ञानिक पिढी आणि समाज घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत . त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाळ श्रीफळ देऊन गौरवित  असल्याचे सांगून  त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम तांबे  सरांनी केले तर आभार  तेजराज कदम यांनी मानले
.

Read More*बुद्धांचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवादच जीवन सुखी बनवेल .*

error: Content is protected !!