खारेपाटण महाविद्यालयांतर्गत खारेपाटण येथे स्वच्छता अभियान

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण येथील DLLE , NSS , NCC विभागाच्या वतीने संयुक्तरित्या स्वच्छता अभियान रॅली व स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे हे आवर्जून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “स्वच्छता ही केवळ मोहिम नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच
या उपक्रमात DLLE विभाग प्रमुख प्राध्यापक माधवी पांचाळ NSS विभाग प्रमुख प्राध्यापक रश्मी देसाई, NCC विभाग प्रमुख प्राध्यापक गजानन व्हंकळी, डॉ. वंदना शिंदे, प्राध्यापक सागर इंदप व प्राध्यापक विघ्नेश सावंत यांचीही यावेळी उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी घोषवाक्ये देत परिसर स्वच्छ केला व “स्वच्छ खारेपाटण – सुंदर खारेपाटण” असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला.





