कुडाळ मध्ये दाखल जि प साठीच्या ४८ अर्जात २४ अपक्ष

प स साठीच्या ६४ अर्जात २० अपक्षाचे अर्ज

पिंगुळीत जि प साठी तब्बल ११ अर्ज दाखल

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदसाठी ४८ तर पंचायत समितीसाठी ६४ जणांनी अर्ज दाखल केले. बऱ्याच ठिकाणी बंडखोरी झाल्याचे चित्र दिसून आले. पिंगुळी जिल्हा परिषद साठी तर तब्बल ११ जणांनी तर पावशी जिल्हा परिषदसाठी ९ जणांनी अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूसे यांनी दिली. दरम्यान जिल्हा परिषदेसाठी दाखल झालेल्या ४८ नामनिर्देशन पत्रा पैकी २४ जणांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज विक्रीच्या आजच्या शेवटच्या दिवशी सुद्धा दुपारी दोन वाजेपर्यंत जि प साठी ९ आणि प स साठी ११ असे एकूण २० अर्ज विक्रीस गेले. १६ जानेवारीपासून अर्ज विक्री सुरु झाली तेव्हापासून आज पर्यंत जि प साठी ९७ तर प स साठी १४७ अर्ज मिळून एकूण २४४ अर्ज विक्रीस गेले. आजच दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने सर्वांचे अर्ज दाखल होईपर्यंत सायंकाळचे ७ वाजले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूसे यांनी माध्यमांना माहिती दिली. उद्या पासून अर्जाची छाननी होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी ४८ अर्ज

आंब्रड – शेजल शेखर परब (उबाठा), दीपलक्ष्मी सुशांत पडते (शिवसेना), सोनाली पांडुरंग सावंत (उबाठा). वेताळबांबर्डे – नागेश नारायण आईर (शिवसेना), प्रवीण भास्कर मर्गज (अपक्ष) बाजीराव बच्चाराम झेंडे (उबाठा), कीर्तिकुमार भास्कर तेरसे (अपक्ष), प्रदीप पुरुषोत्तम गावडे (अपक्ष), महेश मधुकर पारकर (अपक्ष), महादेव यशवंत सावंत (अपक्ष). ओरोस बु. – सुप्रिया संतोष वालावलकर (भाजप), जान्हवी जगन्नाथ सावंत (उबाठा), प्रीती प्रकाश देसाई (अपक्ष). पावशी – भानुदास सूर्यकांत रावराणे (अपक्ष), तानाजी यदुवीर पालव (अपक्ष). दयानंद वसंत अणावकर (अपक्ष), रामदास गोपाळ ठाकूर (अपक्ष), तुकाराम उर्फ दादा चंद्रकांत साईल (शिवसेना), अमरसेन पुष्पसेन सावंत (उबाठा), सिद्धेश शंकर परब (अपक्ष), भिकाजी पांडुरंग कोरगावकर (अपक्ष), भिकाजी सोमवार जाधव (वंचित बहुजन आघाडी).
नेरूर देऊळवाडा- संजय धोंडदेव पडते (शिवसेना), रुपेश अशोक पावसकर (अपक्ष), विजय नारायण लाड (उबाठा), मंगेश दामोदर बांदेकर (अपक्ष). तेंडोली – आरती हरिश्चंद्र पाटील (भाजप), अरुणा अरुण राऊळ (उबाठा), सुजाता सचिन गावडे (उबाठा), वर्षा गोपाळ कुडाळकर (अपक्ष) . पिंगुळी – समीर कृष्णा दळवी (अपक्ष), गंगाराम गणेश सडवेलकर (उबाठा), प्रसाद उर्फ प्रकाश महादेव दळवी (अपक्ष), मयूर कार्तिक परब (अपक्ष), अजय सत्यवान आकेरकर (भाजप), रुपेश सीताराम धुरी (अपक्ष), अंकुश रामा जाधव (वंचित बहुजन आघाडी), गजानन राजेंद्र राऊळ (मनसे), कल्पेश केशव म्हापसेकर (उबाठा), कल्पेश काशिनाथ मसके (अपक्ष), वर्षा गोपाळ कुडाळकर (अपक्ष). घावनळे – सखाराम चंद्रकांत खोचरे (उबाठा), आनंद नारायण मेस्त्री (अपक्ष), केशव उर्फ दीपक रमेश नारकर (शिवसेना). माणगाव – दीपक जयराम काणेकर (अपक्ष), रुपेश रवींद्र कानडे (शिवसेना), प्रसाद मदन नार्वेकर (अपक्ष), रमाकांत वसंत ताम्हाणेकर (उबाठा).

४८ जणात २४ अपक्ष उमेदवार

अशा एकूण ४८ जणांनी जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मध्ये शिवसेनेचा राजीनामा देऊन वर्षा कुडाळकर यांनी  तेंडोली आणि पिंगुळी या दोन मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. भाजपचे रुपेश पावसकर हे सुद्धा नेरूर देऊळवाडा येथील अपक्ष लढत आहेत. आनंद मेस्त्री हे राणे समर्थक अअसून त्यांनी घावनळे येथून अपल्श अर्ज भरला आहे. जिल्हा परिषदेसाठी महायुतीतील शिवसेना, भाजप हे पक्ष महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा पक्षाशी लढत आहेत. वंचित बहुजन विकास आघाडी आणि मनसे यांनी सुद्धा आपले उमेदवार उभे केले आहेत. तरीसुद्धा या ४८ जणांमध्ये निम्मे म्हणजे २४ उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे.  

पंचायत समितीच्या १८ जागांसाठी ६४ उमेदवार

आंब्रड – अक्षय दत्ताराम लाड (अपक्ष), दशरथ बाळाराम मेस्त्री (उबाठा), राजेंद्र विठ्ठल भोगटे (अपक्ष), नितीन मधुकर महाडेश्वर (भाजपा). जांभवडे – धोंडी वसंत मडवळ (अपक्ष), बाळकृष्ण विष्णू मडव (शिवसेना), सुभाष गोपाळ मडव (अपक्ष), यशपाल अशोक सावंत (उबाठा), आवळेगाव – योगिता नंदकिशोर पवार (उबाठा), विराणी विष्णू तेरसे (भाजपा), श्रावणी घन:श्याम तेरसे (भाजपा), कुमुदिनी शिवराम सावंत (अपक्ष). वेताळ बांबर्डे – अश्विनी उदय सावंत (शिवसेना), स्मिता अरविंद बांबर्डेकर (अपक्ष), समृद्धी संतोष कदम (उबाठा), स्नेहा मिलिंद दळवी (उबाठा), प्राची प्रमोद परब (अपक्ष), ओरोस बुद्रुक – मयुरेश महेश राणे (अपक्ष), अमित मनोहर भोगले (भाजप), महादेव लक्ष्मण परब (उबाठा), रवींद्र प्रमोद परब (उबाठा), योगेश राजाराम तावडे (अपक्ष). कसाल – यशवंत बळीराम परब (अपक्ष), बापू गणपत पाताडे (शिवसेना), संतोष शंकर कांदळकर (उबाठा), कृष्णा जगन्नाथ आंबेरकर (उबाठा), डिगस – बुद्धनाथ मच्छिंद्रनाथ गोसावी (अपक्ष), निखिल नित्यानंद कांदळगावकर (शिवसेना), नारायण सुरेंद्र मांजरेकर (उबाठा).
पावशी – चित्रा विजय पावसकर (उबाठा), करुणा चंद्रकांत पावसकर (भाजप) रीतिशा राजन जाधव (भाजप). नेरुर देऊळवाडा उत्तर – नीता भास्कर नाईक (शिवसेना), अस्मिता देविदास नाईक (अपक्ष), दीप्ती प्रदीप नाईक (उबाठा), नेरूर देऊळवाडा दक्षिण – अर्चना आत्माराम बंगे (उबाठा), ममता लक्ष्मण देसाई (भाजप), ऋतुजा रुपेश खडपकर (अपक्ष). पाट – प्रियांका समीर जळवी (शिवसेना), प्राची प्रमोद कुंभार (उबाठा). तेंडोली – निखिल राजाराम ओरसकर (अपक्ष), विजय सुरेश प्रभू (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष), मंगेश श्रीकृष्ण प्रभू (भाजप). पिंगुळी – साधना सतीश माडये (भाजप), कश्मिरा केतन शिरोडकर (अपक्ष), देवयानी दीपक धुरी (अपक्ष), ममता दत्तगुरु राऊळ (उबाठा). साळगाव – प्रतीक संतोष सावंत (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार), मिलिंद वसंत नाईक (शिवसेना), कृष्णा दत्ताराम धुरी (उबाठा), राजेंद्र सखाराम धुरी (अपक्ष).
घावनळे – सोनिया संतोष मुंज (उबाठा), अर्चना अनिल घावनळकर (भाजप), संजना संदीप म्हाडगूत (अपक्ष). गोठोस – दिव्यानी धाकू खरात (शिवसेना), दीक्षा दिगंबर तवटे (उबाठा). माणगाव – रत्नाकर बबन जोशी (अपक्ष), प्रज्ञेश प्रकाश धुरी (अपक्ष), कौशल दत्ताराम जोशी (शिवसेना), योगेश दत्ताराम धुरी (उबाठा), एकनाथ सुभाष धुरी (उबाठा). झाराप – सिताराम श्रीधर तेली (भाजप), अच्युत उर्फ अनिकेत राजेंद्र तेंडोलकर (अपक्ष), यज्ञेश तातू गोडे (उबाठा). या ६४ उमेदवारांनी पंचायत समितीच्या १८ जागांसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

६४ उमेदवारात २० अपक्ष ; काँग्रेस आणि राष्ट्रवादी रिंगणात

पंचायत समितीसाठी सुद्धा बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. बंडखोर उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. एकूण ६४ उमेदवारात २० जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी अपक्ष म्हणून माणगाव मधून अर्ज दाखल केला आहे. तसेच अनिकेत तेंडोलकर यांनी सुद्धा महायुतीची उमेदवारी मिळाली नसल्याने झारापमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. सुभाष मडव यांनी सुद्धा जांभवडे मधून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

error: Content is protected !!