निवडणूक निरीक्षक इब्राहिम चौधरी यांची कुडाळला भेट

निवडणूक निरीक्षक इब्राहिम चौधरी यांनी आज कुडाळ तहसील कार्यालयाला भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील आणि अधिकारी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मुंबई इब्राहिम चौधरी, यांची नियुक्ती कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्यांसाठी निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. नियुक्त निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक निरीक्षण करणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही तक्रारी किंवा निवडणूकविषयक बाबींसाठी संबंधित निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





