राष्ट्रीय बेंच प्रेस कॉम्पिटिशन मध्ये आचरा येथील अशेष पेडणेकर, चेतना चव्हाण यांचे यश

दिल्ली फरीदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय बेंच प्रेस कॉम्पिटिशन मध्ये आचरा येथील त्रिनेत्र मित्र मंडळ संचलित, मसल क्रिएशन फिटनेस या जिम चे सदस्य अशेष पेडणेकर यांनी क्लासिक आणि इक्वीप अशा दोन्ही प्रकारात सिल्वर मेडल तर महिलांच्या मास्टर गटात श्रीमती चेतना चव्हाण यांनी सिल्वर मेडल मिळवून आचऱ्याचे आणि जिमचे नाव उज्वल केले आहे. चौतीसाव्या नॅशनल बेंचप्रेस चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन दिल्ली फरीदाबाद येथे करण्यात आले होते. ही स्पर्धा सबज्युनिअर, जूनियर, सीनियर, मास्टर, (स्त्रिया व पुरुष) क्लासिक आणि इक्वीप अशा गटांमध्ये घेण्यात आली होती. जिमचे ट्रेनर मनीष चव्हाण आणि कोकण सिंधू पवार लिफ्टिंग सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय साटम यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
यापूर्वी मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय बेंचप्रेस स्पर्धेमध्ये श्रीमती चेतना चव्हाण यांनी सुवर्ण, तर अशेष पेडणेकर यांनी रौप्य पदक मिळविले होते.

error: Content is protected !!