कणकवली तालुक्यात 8 जिल्हा परिषद साठी 37 तर 16 पंचायत समिती च्या जागांसाठी 60 नामनिर्देशन पत्र दाखल

निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांची माहिती
कणकवली तालुक्यात आज पर्यंत पंचायत समिती करिता एकूण 60 तर जिल्हा परिषद करिता 37 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे 8 जिल्हा परिषदेच्या जागांकरिता 37 तर 16 पंचायत समितीच्या जागांसाठी 60 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहे. उद्या या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशन स्वीकारण्याच्या प्रक्रियेत निवडणूक अधिकारी जगदीश कातकर यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार दीक्षांत देशपांडे आदी सहभागी झाले होते. दुपारी 3 वाजता उमेदवारी अर्ज घेऊन तहसीलदारांच्या कक्षात दाखल झालेल्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत आत मध्ये थांबवून ठेवण्यात आले होते.





