वन अमृत प्रकल्प प्रशिक्षणातून महिलांना आर्थिक समृद्धता लाभेल-संजना सावंत

नरडवे येथे सिंधुदुर्ग वन अमृत प्रकल्प प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संजना सावंत यांच्या हस्ते संपन्न

सावंतवाडी वन विभाग अंतर्गत सिंधुदुर्ग वन अमृत प्रकल्प प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ नरडवे इंग्लिश स्कूल नरडवे येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या माजी अध्यक्षा सौ. संजना सावंत मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 4 गावांची सदर प्रकल्पा साठी निवड करण्यात आली. त्यापैकी नरडवे गावाची निवड करण्यात आली आहे. सदर प्रसंगी व्यासपीठावर श्री. गणपत सावंत(सरपंच, नरडवे), श्री. वैभव नार्वेकर(उपसरपंच), डॉ. योगेश फोंडे (वन अमृत प्रकल्प प्रमुख) श्री. अंकुश सावंत (तंटामुक्ती अध्यक्ष, नरडवे), श्री. आनंद सावंत (सदस्य शालेय समिती, नरडवे इंग्लिश स्कूल नरडवे), श्री. लक्ष्मण सावंत(स्थानिक मंडळ खजिनदार नरडवे इंग्लिश स्कूल नरडवे), श्री. एकनाथ सावंत(स्थानिक मंडळ सहखजिनदार नरडवे इंग्लिश स्कूल नरडवे), माजी मुख्याध्यापक श्री. काजरेकर सर, सौ. अपर्णा सावंत (ग्रा. प. सदस्या), माजी सरपंच सौ. अमिता सावंत, सौ. अर्चना सावंत, सौ. राजश्री पवार, सौ. मुंज, श्री. मुकेश केसरकर, जिद्द ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ. अपर्णा कदम, सचिव सौ. सानिया सावंत, कोषाध्यक्ष सौ. रोहिणी सावंत, सीआरपी सौ. अमृता सावंत, पूजा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण अंतर्गत महिलांना कोकणा मध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या आंबा, काजू, फणस, जांभूळ, करवंद या फळांचे सिरप तयार करणे, तांदूळ व नाचणी पासून लाडू, नानकेट तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. यासाठी साडे चार लाखाची यंत्र सामग्री पुरविण्यात आलेली आहे. या सर्व यंत्रांचे उद्घाटन संपन्न झाले. दिनांक 13 व 14 ऑगस्ट या दोन दिवशी या सर्व यंत्रांचे प्रशिक्षण सर्व महिलांना देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नरडवे आणि आजूबाजूच्या सर्व गावातील महिलांना रोजगार मिळणार असून महिला आर्थिक सक्षम होणार आहेत. तरी याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन सौ. संजना सावंत यांनी केले. सदर प्रकल्पासाठी श्री. विजय वसंत सावंत (जनरल सेक्रेटरी, अखिल नरडवे ग्रामोद्धर संघ) यांच्या वतीने स्व मालकीची मोफत 3 गुंठे जमीन उपलब्ध करून देण्यात आली या त्यांच्या दातृत्त्वा बद्दल सौ. संजना सावंत मॅडम यांनी कौतुकासह अभिनंदन केले. सदर शुभारंभ प्रसंगी नरडवे गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालनसह आभार प्रदर्शन सुशांत मर्गज सर यांनी केले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!