शिंदे शिवसेनेचे कुडाळ तालुक्यातील उमेदवार ठरले

उद्या भरणार उमेदवारी अर्ज
कुडाळ तालुक्यातील जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेचे उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहीती समोर येत आहे. या उमेदवारांना आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म वाटप करण्यात आले.
यात आंब्रड जि.प. – सौ.दीपलक्ष्मी पडते, वेताळबांबर्डे जि.प. नागेश आईर, पावशी जि.प. दादा साईल, घावनळे जि.प. दीपक नारकर, नेरूर देऊळवाडा जि.प., संजय पडते, माणगाव जि.प. साठी रूपेश कानडे
तर माणगाव पं.स. कौशल जोशी, गोठोस पं.स. दिव्यानी खरात, वेताळबांबर्डे पं.स. अश्विनी सावंत, डिगस पं.स. निखील कांदळगावकर, जांभवडे पं.स. बाळू मडव, कसाल पं.स. बापू पाताडे, नेरूर पं.स. निता नाईक, पाट पं.स. प्रियांका जळवी व साळगाव पं.स. मिलिंद नाईक आदी उमेदवार निश्चित झाल्याचे समजते. उद्या बुधवारी सर्व उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.





