बनावट नोटा छपाई करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
कुडाळ पोलीसांची कारवाई; १ लाख ७१ हजाराचा मुद्देमाल जप्त
कुडाळ, बनावट नोटा छपाई करणान्या टोळीचा कुडाळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख ३४ हजाराच्या बनावट नोटा, ३ कलर प्रिंटर असा एकूण १ लाख ७१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निशिगंधा उमेश कुडाळकर (वय २५, रा. पिंगुळी), विजय रविकांत शिंदे (वय २५, रा. मुळदे फौजदारवाडी), सुरेंद्र उर्फ सूर्या रामचंद्र ठाकूर (वय ४०, रा. पलूस जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान तिघांनाही उद्या पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २३ नोव्हेंबर २०२३ ला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुडाळ येथील बैंक ऑफ इंडीया शाखा येथील कॅश डिपॉजीट मशीनमध्ये यातील संबंधिताने ३ हजार २०० रुपये किमतीच्या भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या १९ बनावट चलनी नोटा भरणा होत्या. त्याबाबत शाखाधिकारी बैंक ऑफ इंडीया कुडाळ राजेंद्र दिलीप सोनकुसरे यांनी संबंधिताविरोधात कुडाळ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती. त्यानुसार कुडाळ पोलीस स्टेशन येथे २८ नोव्हेंबर २०२३ ला गुन्हा दाखल होता. त्याचा तपास चालू होता. तपासादरम्यान यातील आरोपीत याने कुडाळ येथील बैंक ऑफ इंडीया शाखा कुडाळ येथील कॅश डिपॉजीट मशीनमध्ये डिपॉजीट केलेल्या बनावट नोटा या आरोपीत क्र. ३ निशीगंधा कुडाळकर हिचे खात्यावर डिपोंजीट केलेल्या असल्याचे समजल्याने त्यावेळी आरोपीत क्र. ३ हिला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली असता तीने आरोपीत सुर्या ठाकूर हा आपले पैसे देणे असल्याने त्याने विनाकारण आपले बैंक खात्यामध्ये खोट्या नोटा डिपोंजीट केलेल्या असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गुन्ह्यातील संबंधिताचा शोध घेत असता गुन्ह्यातील मुळ आरोपी सुरेंद्र याचे लोकेशन हे वारंवार मुंबई, पुणे, गोवा, सांगली असे फिरते लोकेशन असल्याने आरोपीत हा मिळून येत नव्हता. त्यामुदतीत आरोपीत याचे लोकेशन हे पलुस सांगली येथे मिळत असल्याने व त्याचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधितास ९ ऑगस्ट २०२४ ला पलूस जि. सांगली येथून ताब्यात घेऊन त्याच्या कडे असलेले साहित्य जप्त करुन ताब्यात घेण्यात आले. तसेच या गुन्ह्याच्या तपासात कुडाळ शहरातील विजय शिंदे व निशिगंधा कुडाळकर यांचा देखील गुन्हयामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्हयात अटक करुन आरोपीत यांचे ताब्यातुन बनावट चलनी नोटा छपाईसाठी वापरलेले दोन कलर प्रिंटर जप्त करण्यात आलेले आहेत. आरोपीत यांचेकडून एकुण १,३४,७०० रुपये किंमतीच्या १००, २००, व ५०० रुपयेच्या भारतीय बनावट चलनी नोटा तसेच एकुण ३ कलर प्रिंटर व त्याचे साहीत्य मिळून एकूण १,७१,७०० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच यापुवों सिधुदुर्ग जिल्हयात घडलेल्या बनावट चलनी नोटा संदर्भात दाखल असलेल्या गुन्हयात वरील आरोपीत यांचा सहभाग आहे अगर कसे याबाबत तपास चालू आहे. ही कारवाई ही पोलीस अधीक्षक, सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेष रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम याचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कन्हाडकर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र भांड, पोलीस अंमलदार स्वप्रिल तांबे, गणेश चव्हाण, प्रित्तम कदम, कृष्णा केसरकर, रुपेश सारंग, संजय कदम यांनी केली आहे. अशी माहिती राजेंद्र मगदूम यांनी दिली.