वैभववाडीत कोळपे जि. प. मध्ये प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर

वैभववाडीत ठाकरे सिनेला धक्का
ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैध
कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे शिवसेनेचे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज छानणीच्या दिवशी भाजपा कार्यकर्त्यात जल्लोष आहे. गट क्रमांक 1 कोळपे मतदारसंघाची छाननी सुरुवातीला झाली. यावेळी सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्जात शपथपत्र पूर्ण नसल्याने तो अवैध ठरला आहे.





