हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघात मनोज रावराणे यांना उमेदवारी

गेले काही दिवस या मतदारसंघातील पक्षाची उमेदवारी कोणाला मिळते त्याकडे होते सर्वांचे लक्ष
कणकवली तालुक्यातील हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघामधून भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोज तुळशीदास रावराणे यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. या मतदार संघात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत हे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांनी ही जागा आपल्याला मिळावी यासाठी जोरदार मोर्चे बांधणी देखील केल्याची चर्चा होती. परंतु अखेर पर्यंत या जागेवर तिढा सुटत नसताना मनोज रावराणे यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, राजू पाटकर आदी उपस्थित होते.





