*_असाक्षरांनीही मारली बाजी_*

*सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असाक्षरांच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के*

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (प्रतिनिधि): केंद्रपुरस्कृत उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन 2022-27 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दि.17 मार्च, 2024 रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी  (FLNAT) परीक्षेला जिल्ह्यातून 225 असाक्षर प्रविष्ठ झाले होते.  या सर्व असाक्षरांची परीक्षा जवळच्या प्राथमिक / माध्यमिक शाळेमध्ये घेण्यात आली.  सदर परीक्षेचा निकाल दि. 6 मे 2024 रोजी राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या (NIOS) www.nios.ac.in or https://results.nios.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला आहे. या परीक्षेत 225 असाक्षर नवसाक्षर झाले. सदर परीक्षेच्या निकालाची सांख्यिकीय माहिती खालीलप्रमाणे आहे.
ज्या असाक्षरांची नोंद उल्लास ॲपवर करण्यात आली होती, अशाच असाक्षरांना परीक्षेला बसण्याची परवानगी होती.  उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची संख्या 256 होती. पैकी 225 असाक्षर परीक्षेला प्रविष्ठ होते. 31 असाक्षर परीक्षेस प्रविष्ठ झाले नाहीत. उल्लास ॲपवर नोंद होणाऱ्या असाक्षरांची परीक्षा चालू वर्षी माहे सप्टेंबर, 2024 मध्ये आयोजित केली जाणार आहे. 
तपशील मुद्दा परीक्षा दिलेल्या असाक्षरांची संख्या उत्तीर्ण नवसाक्षर संख्या सुधारण आवश्यक असा शेरा नमूद असलेले असाक्षर संख्या शेकडा उत्तीर्ण
पुरूष (M) 26 26 0 100
स्त्रिया (F) 199 199 0 100
तृतीयपंथी (T) 0 0 0 —
एकूण 225 225 0 100
जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले, सन 2023-24 मध्ये दि.17 मार्च, 2024 रोजी घेण्यात आलेल्या असाक्षरांच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला.  उत्तीर्ण परीक्षार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच सर्व प्राथमिक / माध्यमिक शिक्षक, सर्व स्वयंसेवक, सर्व सर्वेक्षक, सर्व मुख्याध्यापक व तालुकास्तरावरील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचेही अभिनंदन. सिंधुदुर्ग जिल्हा 100 टक्के साक्षर करण्यावर सर्वांनी भर द्यावा.
मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख म्हणाले, सन 2022 ते सन 2027 या कालावधीत नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून सन 2024-25 मध्ये 4721 असाक्षरांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून असाक्षर व्यक्तींनी आपली नावे आपल्या गावातील प्राथमिक / माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक यांच्याकडे नोंद करावीत व साक्षरतेचा टक्का वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
शिक्षण संचालनालय (योजना) तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे शिक्षण संचालक, डॉ. महेश पालकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरतेत प्रथम क्रमांकावर असून चालू वर्षी एकूण 225 असाक्षरांनी परीक्षा दिली. असाक्षरांचा निकाल 100 टक्के लागला असून साक्षरतेत 225 लोकांची भर पडली आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व नवसाक्षरांना साक्षरतेचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक यांचेकडे शिक्षण संचालनालय (योजना) यांचेमार्फत दिली जाणार आहेत.
वैयक्तिक निकाल प्राप्त करण्यासाठी Path www.nios.ac.in or https://results.nios.ac.in ला भेट देणे
Examination / Result Click here for Result ULLAS Nav Bharat Saksharta Karyakram Marksheet Cum Certificate Enrollment Number, Year, Month आणि Captcha टाकून Submit बटनावर Click करावे  Print
केंद्र शासनाने वरीलप्रमाणे संकेतस्थळावर ऑनलाईन गुणपत्रक / प्रमाणपत्र दि.6 मे 2024 रोजी माहितीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. सदरील वैयक्तिक गुणपत्रक / प्रमाणपत्राची संकेतस्थळावरून ऑनलाईन Print घेता येईल.  गुणपत्रक / प्रमाणपत्राची प्रमाणित हार्ड कॉपी शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यामार्फत सर्व संबंधितांना मुख्याध्यापकांमार्फत यथावकाश वितरीत करण्यात येईल. अशी माहिती सदस्य सचिव, जिल्हास्तर नियामक परिषद/ कार्यकारी समिती, नव भारत साक्षरता कार्यक्रम तथा शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली आहे.  
00000

error: Content is protected !!