मोबाईल विधी सेवा तथा लोक अदालत योजनेचा कुडाळ येथे शुभारंभ

संत राऊळ महाराज महाविद्यलयात विविध विषयांवर मार्गदर्शन

महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचे निर्देशानुसार दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळ व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी मोबाईल व्हॅन मार्फत जन जागृती शिबीराचे आणि ६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत नेरुर येथे मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुशंघाने आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दिवाणी न्यायालय कुडाळ येथे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी. ए .कुलकर्णी यांचे हस्ते मोबाईल व्हॅनला हिरवा झेडा दाखवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
आज संत राउळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे मोबाईल व्हॅन मार्फत जन जागृती शिबीर झाले. दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी बॅ नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग एम.आय. डी.सी. कुडाळ येथे मोबाईल व्हॅन मार्फत जनजागृती शिबीर होणार आहे. दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत नेरुर येथे मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. आजच्या शुभारंभ प्रसंगी कुडाळ तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष वकील सुरेंद्र मळगांवकर, वकील संजय रानडे, वकील श्रीमती रुपाली कदम, संत राउळ महाराज महाविदयालय कुडाळचे सह प्राचार्य डॉ. व्ही. जे. भास्कर, प्राध्यापक डॉ. एस. टी. आवटे, सहायक सरकारी वकील नितीन कुंटे, पोलीस ठाणे कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे, पंचायत समिती कुडाळचे सहा. प्रसाशन अधिकारी मृणाल कार्लेकर, विधी स्वंयसेवक मंगेश अडसुळ, पुजा गोडकर, प्राची परब, सुधा दामले व दिवाणी न्यायालयातील कर्मचारीवृंद उपस्थित होता. या उदघाटन कार्यक्रमानंतर मोबाईल व्हॅन आज होणाऱ्या संत राउळ महाराज महाविदयालय कुडाळ येथील नियोजीत कायदेविषयक कार्यक्रमास मार्गस्थ झाली .
महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचे निर्देशानुसार दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने पहिल्या दिवशी संत राऊळ महाराज महाविद्यालयात मोबाईल व्हॅन मार्फत लोक अदालत तसेच जन जागु्ती शिबीर संपन्न झाले. संत राउळ महाराज महाविदयालय महाविदयालयाचे सह प्राचार्य डॉ व्ही जी भास्कर यांच्या अघ्यक्षेतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वकील संजय रानडे यांनी माहिती अधिकार कायदा अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परीणाम, नागरीकांची मुलभुत कर्तव्ये याविषयी माहिती दिली . वकील श्रीमती रुपाली कदम यांनी महिलांबाबतचे विविध कायदे यांनी माहिती दिली. दिवाणी न्यायालयाचे वरीष्ठ लिपीक आर.टी.आरेकर, विधी स्वंयंसेवक मगेश अडसुळे, विधी स्वयंसेवक पुजा गाेडकर यांनी विधीसेवा समितीव्दारे राबवत असलेल्या योजना व उपक्रम याबाबत माहिती दिली.
संत राउळ महाराज महाविदयालय कुडाळचे सह प्राचार्य डॉ. व्ही. जी. भास्कर यांनी अघ्यक्षीय भाषणात सदर कार्यक्रमांमुळे विदयार्थ्यानां विविध कायदयांची मोलाची माहिती मिळाली व विधी सेवा प्राधिकरणचे व्यापक कामकाजाबाबत प्रसंशा केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक भावेश चव्हाण यांनी केले. संत राउळ महाराज महाविदयालय कुडाळचे प्राध्यापक डॉ. एस. टी. आवटे यांनी सर्वाचे आभार माणून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात ७० ते ७५ विदयार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थतीत होते .

error: Content is protected !!