फोंडाघाट जिल्हा परिषद व पंचायत समितीचे महाविकास आघाडीचे उमेदवार घरोघरी प्रचारात आघाडीवर

राष्ट्रवादीचे उमेदवार अनंत पिळणकर व ठाकरे सेनेच्या उमेदवार कीर्ती एकावडे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

फोंडा जिल्हा परिषद मतदार संघातील लोरे पंचायत समिती मध्ये पियाळी गावात फोंडा जिल्हा परिषदेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनंत पिळणकर व लोरे पंचायत समितीचे उमेदवार सौ. कीर्ती कृष्णा एकावडे यांचा पियाळी गावामध्ये प्रचाराचा घरोघरी धडाका लावण्यात आला आहे. अनंत पिळणकर यांना व पंचायत समितीचे उमेदवार कीर्ति एकावडे या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महिला विभागाच्या तालुका प्रमुख माधवी दळवी, उपतालुकाप्रमुख संजना कोलते, या सिद्धेश राणे, शाखाप्रमुख निलेश राणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे फोंडा विभाग प्रमुख रमेश राणे, प्रकाश उर्फ बबन नारकर, प्रवीण गुरव, संजय बंदरकर, घोणसरीचे माजी सरपंच कृष्णा एकावडे, घोणसरीचे ग्रामपंचायतचे सदस्य सचिन मेस्त्री, प्रकाश मडवी,
विशाल राणे, प्रीतम राणे, गौरव एकावडे आधी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!