पाट हायस्कूल चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के

एस . एल .देसाई विद्यालय पाट विद्यालयात शासकीय रेखाकला परीक्षा 2025 यामध्ये यशाची परंपरा कायम ठेवत 100% निकाल लागलेला आहे. एलिमेंटरीआणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेमध्ये 80 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. एलिमेंटरीसाठी 58 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये 12 विद्यार्थ्यांना बी श्रेणी प्राप्त झाली.
धनिशा निलेश परब आणि विघ्नेश भगवान खोत यांना ए श्रेणी मिळालेली आहे. तर इंटरमिजिएट मध्ये दहा विद्यार्थी बी श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले तर अंतरा प्रवीण केरकर, धनदा वैभव सावंत, दिशा श्रीकृष्ण सामंत, जागृती ज्ञानेश्वर राऊळ, कल्पित हेमंत परब, मिहीर विजय मिस्त्री, स्वरांगी सच्चिदानंद सर्वेकर, यांनी ए श्रेणी प्राप्त केली.
या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक संदीप साळस्कर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक राजन हंजनकर .पर्यवेक्षक सयाजी बोंदर, कलाशिक्षक संदीप साळसकर, गुरुनाथ केरकर, जान्हवी पडते आणि दीपिका सामंत यांच्या हस्ते गुलापुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
पाट हायस्कूलमध्ये विविध कलाविषयक उपक्रम घेतले जातात. त्यामध्ये ही हे विद्यार्थी सहभागी असतात. एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेमुळे कलाविषयक विविध क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे विद्यालयातील बरेच विद्यार्थी पुढे करिअरसाठी कला हा विषय निवडतात आणि राज्यभरातील विविध आर्ट कॉलेजमधून आपल्या कलागुणांना विकसित करतात. या सर्वांचे पंचक्रोशीतून अभिनंदन केले जात आहे.





