वीर परीवार सहायता योजनेचा लाभ घ्या – न्या. जी. ए. कुलकर्णी

कुडाळ न्यायलायात वीर परीवार सहायता योजना माहिती सत्र
संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी असलेल्या ‘वीर परीवार सहायता योजना २०२५’ चा लाभ संबंधितांनी घ्यावा असे आवाहन कुडाळ दिवाणी न्यायालयचे दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कुडाळ जी ए कुलकर्णी यांनी केले. तालुका विधी सेवा समिती कुडाळ व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय कुडाळ येथे संरक्षण कर्मचारी, माजी सैनीक आणि त्यांचे परीवारास वीर परीवार सहायता योजना २०२५ चे माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
राष्टीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचे निर्देशानुसार दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने मंगळवारी दिवाणी न्यायालय कुडाळ येथे संरक्षण कर्मचारी माजी सैनीक आणि त्यांच्या परीवारास वीर परीवार सहायता योजना २०२५ चे माहिती सत्राचे आयोजन कुडाळ दिवाणी न्यायालयचे दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कुडाळ जी ए कुलकर्णी यांच्या अध्यक्षेतेखाली करणेत आले होते.
ही योजना देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना त्यांच्या कौटुबिक कायदेशीर अडचणींपासून दिलासा देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ही योजना देशभरात विविध ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना मोफत व कायदेशीर मदत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या कार्यक्रमात वकील समीर कुलकर्णी व वकील सुरेंद्र मळगांवकर यांनी या योजनेची सवित्तर माहीती दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुडाळ तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचे अघ्यक्ष शामसुंदर सावंत यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार दिवाणी न्यायालयाचे वरीष्ठ लिपीक के टी कदम यांनी केले या कार्यक्रमात २० ते २५ संरक्षण कर्मचारी व माजी सैनीक उपस्थतीत होते.





