“त्या” मतदारांना मतदानाचा अधिकार प्रशासनाने मिळवून द्यावा!
भाजपाच्या शिष्टमंडळाची कणकवली प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
कणकवली तालुक्यातील प्रशासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या भाड्याच्या गाड्यांवरील ड्रायव्हर आपल्या इलेक्शन ड्युटीवर असल्याने त्यांची पर्यायी व्यवस्था मतदानासाठी झाली नाही. असे अनेक जन मतदानापासून वंचित राहिले आहेत. एकीकडे शासन निवडणूक विभागाच्या वतीने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यावर शासनाने विविध कार्यक्रम देखील घेतले होते. असे असताना देखील कणकवली तालुक्यातील आपल्या निवडणूक विभागाच्या संबधित असलेल्या भाड्यांच्या गाड्यांवरील ड्रायव्हर मतदानापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहेत. तरी प्रशासनाच्या वतीने त्यांना मतदान करण्यासाठी यंत्रणा राबवावी अशी मागणी कणकवली भाजपच्या वतीने प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष आण्णा कोदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कलमठ उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, समीर प्रभूगावकर, निखिल आचरेकर, अभय घाडीगावकर आदी उपस्थित होते.
कणकवली /प्रतिनिधी