गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात गवारेड्याचा वाढता वावर

ग्रामस्थांत घबराट

तालुक्यात गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात गवारेड्याचा वावर वाढला असून बुधवारी सकाळी या परिसरातील ग्रामस्थ प्रथमेश तेंडोलकर यांच्या सात-आठ गवारेड्याचा कळप निदर्शनास आला. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने गवारेड्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या या भागात गवारेड्याचा कळप बिनधास्तपणे वावरत आहे.
या भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरची, शेंगदाणा, कुळीथ, भाजीपाला लागवड केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

error: Content is protected !!