नेपाळी कामगारावर चाकू हल्ला प्रकरणी आरोपीला सशर्थ जामीन मंजूर

आरोपी तर्फे ॲड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले

कणकवली शहरातील चायनीज सेंटर मध्ये काम करणाऱ्या लोकेष बिस्त या नेपाळी कामगाराच्या डोक्यावर चाकूने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्यादी कबीर लालसिंह बोहरा मुळ राह. नेपाळ (सध्या राह. कणकवली) याने दिनांक ०६/०१/२०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून कणकवली पोलिस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३५२, ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करून आरोपी सुनील इंदर परिवार मुळ राह. नेपाळ (सध्या राह. कणकवली) याला अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. जामीन अर्जावर ॲड. अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केल्यानंतर संशयित आरोपीला १५ हजारांचा सशर्त जामिन मंजूर करताना सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. देशपांडे यांनी आरोपीने फिर्यादी अथवा साक्षीदारावर दबाव आणू नये, त्याना धमकावू नये, सरकारी पक्षाच्या पुराव्यात ढवळाढवळ करू नये, प्रत्येक मंगळवारी पोलिस स्टेशनला हजेरी लावावी, तपासकामात सहकार्य करावे, पोलिस स्टेशनला आपला पासपोर्ट जमा करावा, कोर्टाचे पूर्व परवानगीशिवाय महाराष्ट्र राज्याबाहेर तसेच देशाबाहेर जाऊ नये आदी अटी घातल्या आहेत. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केला.

error: Content is protected !!