शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या कार्यकारी मंडळ निवडणुकीच्या मार्ग मोकळा

संस्थेच्यावतीने दाखल अर्ज धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मंजूर

संस्थेच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली यासंस्थेची घटनेप्रमाणे पुढील कार्यकारी मंडळ निवडण्यासाठी धर्मादाय आयुक्तांच्यामार्फत निवडणूक अधिकारी नेमून निवडणूक घेण्याबाबत निर्देश देण्याचा सचिव विजयकुमार कळंजू यांचा अर्ज सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती ए. जी. कुलकर्णी यांनी मंजूर केला आहे. संस्थेच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली या संस्थेची २०१४ ते २०१७ या कालावधीसाठी नोंदणीकृत कार्यकारिणी धर्मादाय आयुक्तांनी मंजूर केली होती. त्यांनंतर २०२२ ते २०२५ या कालावधीकरीता निवडलेल्या कार्यकारी मंडळाद्याचतचा बदल अर्ज धर्मादाय आयुक्तांनी स्विकारला नव्हता. त्यानंतर पुढील कालावधीसाठी धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली निवडणूक घेण्यात यावी यासाठी संस्था सचिवांनी अर्ज दाखल केला होता. या अर्जाला संस्थेच्या तत्कालीन कार्यकारी मंडळातील विश्वस्य सदानंद हर्णे व रुपेश मुसळे यांनी हरकती नोंदविल्या होत्या.
हरकतीप्रमाणे २०१० करण्यात आलेल्या संस्थेच्या सभासदांना मतदानासाठी पात्र ठरविण्यात येऊ नये, असा मुद्दा उपस्थित केला होता. शिवाय रुपेश मुसळे यांनी त्याबाबत संस्थेविरूद्ध २०१० मध्ये करण्यात आलेले सभासद हे घटनाविरोधी असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी, असा स्वतंत्र चौकशी अर्जही दाखल केला होता. दोन्ही अर्जाची चौकशी एकत्रित करण्यात आली. त्यानंतर हरकती फेटाळून संस्थेने दाखाल केलेले अर्ज पुर्णतः मान्य करत संस्थेची पुढील कालावधीसाठी निवडणूक घेण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्याची निवड करण्यात येऊन त्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहिर करावा त्यांनी न्यासाच्या कागदपत्रांची छाननी करावी, सभासदयादी निश्चित करावी व निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आदेश दिले. त्यामुळे संस्थेचे नविन कार्यकारीमंडळ अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

error: Content is protected !!