आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान

हिंदी विकास संस्थान, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड–२०२५ मध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत शाळेतील रुही भंडारी इयत्ता 6 वी व सृजनी हलदार इयत्ता 10 वी या दोन विद्यार्थिनींची ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ साठी निवड झाली. त्यांनी हिंदी विषयात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले व त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावरील हिंदी प्रतिभा सन्मानासाठी करण्यात आली.
हिंदी विकास संस्थान, दिल्ली यांच्या मार्फत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी सन्मान समारंभ–२०२५ अंतर्गत ३० जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथील तीन मूर्ती भवन, प्रधानमंत्री संग्रहालय येथे झालेल्या भव्य समारंभात डॉ. पूरन चंद टंडन – निदेशक, भारतीय अनुवाद परिषद, नवी दिल्ली, डॉ. पीयूष कुमार शर्मा – अध्यक्ष , हिंदी विकास संस्थान , दिल्ली यांच्या हस्ते रुही व सृजनीला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच हिंदी विषय शिक्षिका ज्योती मस्के यांना शिक्षक प्रशस्तीपत्र व प्राचार्य अस्कर अली यांना प्रधानाचार्य गौरव सन्मान प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या यशाबद्दल शाळेचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती, प्राचार्य अस्कर अली, शिक्षक व पालकांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन व कौतुक केले. “हिंदी भाषेच्या अध्ययनात सातत्यपूर्ण परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे मत संचालिका सस्मिता मोहंती यांनी व्यक्त केले. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल, अशी भावनाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.”

error: Content is protected !!