श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट, मालवण या मठामध्ये सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रौत्सवास येणाऱ्या भाविकांसाठी विनामूल्य सेवेचे आयोजन

श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू.सदगुरु श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि. संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट, मालवण या मठामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी…सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रौत्सवास येणाऱ्या भाविक, भक्तांनसाठी विनामूल्य सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.

मठात येणाऱ्या भाविक, भक्तांनसाठी सकाळी 7 ते 11 वा. चहा, नाष्टा, दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत जेवण-अन्नदान व संध्याकाळी 4 वा. चहा व अल्पाहार देण्यात येणार आहे. तरी भाविक भक्तांनी यांचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती मठाच्या वतीने करण्यात आली आहे.
श्रीस्वामी समर्थ मठ मसदे-वडाचापाट
अधिक माहितीसाठी संपर्क 9423538418 / 9420738418 /9321819111 या नंबर वर संपर्क साधावा.

error: Content is protected !!