आचरा पारवाडी येथे ५फेब्रूवारी पासून हरीनाम सप्ताह

ब्राह्मण देव मंदिर पारवाडी येथे गुरुवार 5 फेब्रुवारीपासून हरिनाम सप्ताह सुरू होत आहे. रविवार आठ फेब्रुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चालणा-या या हरिनाम सप्ताहात रोज रात्री ठीक साडेअकरा ते एक वाजेपर्यंत ब्राह्मण देव दिंडी मंडळ आचरे पारवाडी यांचा चित्ररथ दिंडी कार्यक्रम सादर होणार आहे.तरी या हरीनाम सप्ताहास भाविकांनी आणि भजनी मंडळांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
यानिमित्त
मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता सत्यनारायण महापूजेचे आयोजन ब्राह्मण देव मंदिर येथे करण्यात आले आहे.यानिमित्त रात्रौदहा वाजता श्रीदेवी माऊली दशावतार नाट्य मंडळ चिंचोली सावंतवाडी यांचा दशावतारी नाट्य प्रयोग धर्म विजय सादर होणार आहे.तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री ब्राह्मण देव सांस्कृतिक विकास मंडळ आचरेपारवाडी तर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!