फोंडाघाट मतदार संघातील जनतेने प्रचारात मला दिलेली साथ कधीही विसरणार नाही!

पियाळी मध्ये राजन चीके यांच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद

गावोगावी राजन चीके यांना वाढता पाठिंबा

पियाळी गावातील मतदारांवर माझा पूर्ण विश्वास असून, पियाळी गावच्या विकासासाठी मतदार मला निश्चितपणे साथ देतील याची मला खात्री देखील आहे. कारण पियाळी गावाने आतापर्यंत विकासाच्या बाजूने राहत साथ दिली आहे. या निवडणुकीत मला विजयी करताना मोठ्या मताधिक्याचा देखील इतिहास मतदार घडवतील असा विश्वास फोंडाघाट मतदार संघाचे अपक्ष उमेदवार राजन चीके यांनी व्यक्त केला. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातील पियाळी मध्ये प्रचार फेरी दरम्यान चिके बोलत होते. एखाद्या पक्षाच्या उमेदवारापेक्षा तिप्पट कार्यकर्ते सोबत घेऊन त्यांनी प्रचार रॅली काढली. त्यामुळे त्यांच्या प्रतिसादाचा धक्काच विरोधकांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पियाळी सह अन्य गावांमध्ये प्रचारासाठी फिरत असताना त्यांनी विकास हा मुद्दा प्रामुख्याने जनतेपर्यंत मांडत विकासाच्या मुद्द्यावरच मी निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले. भाजपा सारख्या पक्षामध्ये काम करत असताना गेल्या 37 वर्षात जर अन्याय होत असेल तर अन्याय विरोधात गप्प बसणे हे माझे काम नाही. जनतेने मला साथ दिली ही साथ मी विसरणार नाही. असे देखील त्यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत रविंद्र घाडी
सत्यवान गुरव, रोहित गुरव, सागर नारकर, साहिल गुरव, अमोल गुरव,
कैलास गुरव यांच्यासहित राज्यांची के हितचिंतक व प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!