मतदान जनजागृतीपर पोईप येथे पथनाट्य सादर

अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे व निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांची प्रमुख उपस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पोईप विरण बाजार पेठ येथे मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीपर उत्कृष्ट असे पथनाट्य सादर केले.

सर्व प्रथम सौ.इ.द.वर्दम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण या प्रशालेतील विद्यार्थ्यांनाची मतदान जनजागृतीपर रॅली काढण्यात आली त्यानंतर पोईप विरण बाजार पेठ येथे मतदान जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे व,निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार , मालवण तहसीलदार गणेश लव्हे, नायब तहसिलदार प्रिया हर्णे, मालवण गटविकास अधिकारी श्री शामसुंदर चव्हाण,कणकवली गटविकास अधिकारी व मालवण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री अरुण चव्हाण, गटशिक्षणाधिकारी श्री माने,पोईप मंडळ अधिकारी श्री संतोष गुरखे,पोईप सरपंच श्रीधर नाईक,मसदे चुनवरे सरपंच सौ वाडकर,पोईप हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री कुंभार, केंद्र शाळा पोईप नं 1चे मुख्यादयापक श्री विकास घाडीगांवकर, पोईप,मसदे चे तलाठी आणि कोतवाल, ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थिती होते तसेच उपस्थित सर्व मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले

error: Content is protected !!