श्वेता सावंत सिंधुकन्या कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित

अहिल्यानगर श्रीरामपूर येथे दोस्ती फांऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरी लोककलावंत आणि कला साहित्यिक यांस विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यासाठी राज्यातुन अनेक कलावंतांना आमंत्रित करण्यात आले होते. यात साहित्यिक कवयित्री श्वेता सावंत सिंधुकन्या यांना कोकणरत्न हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कोकणच्या शिरपेचात कोकणरत्न हा मानाचा तुरा रोवला गेल्याने सर्व स्तरातून श्वेता सावंत सिंधुकन्येवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आजवर विविध क्षेत्रातून अनेक पुरस्कारानी सन्मानित झालेल्या या सिंधुदुर्गाच्या लेकीला पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा!





