जागतिक कर्करोग दिनानिमित्त पीएमश्री स्कूल शाळा क्रमांक ३ येथे जनजागृती कार्यक्रम

४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त भालचंद्र महाराज विद्यालय शाळा क्रमांक तीन कणकवली येथे कर्करोग व तंबाखू ,तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत माहीती देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता राजेंद्र मुंबरकर, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई मुख्याध्यापिका सौ अक्षया राणे,
श्रीमती प्रतिभा कोतवाल,
श्री निवृत्ती गुरव, श्री संतोष घाडीगावकर ,श्री महेश पाटील,
श्री संजय तांबे ,सौ सुरेखा सावंत
सौ रुपाली डोईफोडे सौ अश्विनी साटम,अर्चना राऊत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी , तंबाखू, व विडी सिगारेट गुटखा मशेरी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासारखा जीवघेणा आजार उद्भवू शकतो तसेच इतर आजार अन्य हानिकारक दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. याची पोस्टरद्वारे माहिती देऊन तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचा दुष्परिणाम व कर्करोग टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागेल असे मत नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी व्यक्त केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अक्षया राणे यांनी आपले विचार व्यक्त करताना सिंधुदुर्गातील शाळांना व्यसनमुक्त करण्यासाठी “व्यसनमुक्त शाळा दत्तक” अभियान राबवावे अशी नशाबंदी मंडळाकडे विनंती केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी तंबाखू मुक्तीचा सामूहिक संकल्प करून समाजाला आरोग्यदायी व व्यसनमुक्त बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.





