स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले मुलीचे प्राण !

जीवरक्षक बनलेल्या त्या मुलांचे पाट हायस्कूलमध्ये कौतुक
प्रतिनिधी । कुडाळ : शाळासुटल्यावर घरी जाताना ओढ्यात पाय घसरून पडलेल्या मुलीला दोन मुलांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचविले. पाट येथे हि घटना घडली. त्या मुलीसाठी ती दोन मुलं जणू जीवरक्षकच बनली.
कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसात मुलांना पाण्यासंदर्भात सूचना दिलेल्या असतात ओढ्याच्या कडेने जाताना एकत्र जा पर्यायी मार्गाचा वापर करा या सूचना नियमित दिल्या जातात तरी पाट हायस्कूल जुनियर कॉलेजची दुपारचे बॅच सुटल्यानंतर मेस्त्री वाडी पाट मधील ओढ्याच्या कडेने जाताना एका शालेय विद्यार्थिनीचा पाय घसरला व ती पाण्याच्या दिशेने ओढली जाऊ लागली पाण्याचा झोत मोठा असल्यामुळे पाण्याचा भोवरा तयार झाला होता या वेळेचे प्रसंगावधान राखत मागाहून येणारे कुमार जितेश रामचंद्र भगत आणि कुमार जयेश विष्णू कोनकर या दोघांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत पाण्यात उड्या घातल्या आणि बुडणाऱ्या मुलीचे प्राण वाचवले या त्यांच्या धाडसाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे खजिनदार देवदत्त साळगावकर आणि पर्यवेक्षक राजन हंजनकर शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर ज्येष्ठ शिक्षक श्री बोंदर सर केरकर सर आणि इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन कौतुक केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.