ठाकरे शिवसेनेने केला भाजपा कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा

नगरपंचायत निवडणुकी नंतर पहिल्यांदाच असा वाढदिवस साजरा

कणकवली नगरपंचायत ची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये भाजपाच्या पदरी पराभव आल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींनी ही निवडणूक लक्षवेधी ठरली. यात नेहमी चर्चेत असणारा 10 नंबर प्रभाग हा या निवडणुकीत देखील चर्चेत राहिला होता. या 10 नंबर प्रभाग मधून भाजपा नगरसेविका आर्या राणे या विजयी झाल्या होत्या. याच आर्या राणे यांचे पती व कणकवलीच्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असणारे औदुंबर राणे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसा दिवशी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासहित ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज नगरपंचायत मध्ये औदुंबर राणे यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांचा केक कापून नगराध्यक्ष पारकर यांच्या हस्ते त्यांना केक देखील भरवण्यात आला. भाजपा कार्यकर्त्याचा ठाकरे शिवसेनेने कणकवली नगरपंचायतच्या बहुचर्चित निवडणुकीनंतर साजरा केलेला हा बहुदा हा पहिलाच वाढदिवस असल्याने कणकवली शहरात मात्र या साजऱ्या झालेल्या वाढदिवसाची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच कणकवली चा डीपी प्लान देखील जाहीर झाला असून,त्या अनुषंगाने काही अनेक नाट्यमय घडामोडी देखील शहरात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!