कुडाळ नगरपंचायत हद्दीतील थकीत आठ मालमत्ता सील

थकीत मालमत्ताधारकांस दणका

कर वसुली मोहीम वेगात

नगरपंचायत कार्यक्षेत्रातील न. पं. चा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र केलेली आहे. काल बुधवारी ११ मार्च रोजी आठ मालमत्ता सील करण्याची कारवाई नगरपंचायत प्रशासनाने केली आहे. दरम्यान मार्च अखेरची धावपळ सुरु असल्याने न. पं. च्या कर वसुलीच्या मोहिमेने वेग घेतला आहे.
कुडाळ न. पं. मध्ये मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर थकविल्याने त्यांच्या मालमत्तेवर नगरपंचायतीमार्फत जप्तीची कारवाई मोहीम सुरु आहे. कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविण्यात आली होती. थकित कर भरणा न केल्यास मालमत्ता जप्त केल्या जातील, असा इशारा देत थकीत व चालू आर्थिक वर्षाचा कर भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले होते. दरम्यान, थकीत मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी न. पं. ने जप्ती पथक तैनात केले असून, या पथकामार्फत महिनाभर शहरात कारवाई मोहीम सुरु राहणार आहे.
बुधवारी दि. ११ मार्च २०२६ रोजी न. पं. हद्दीतील एकूण ८ मालमत्ता सील करण्यात आले. ही कारवाई कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी सागर पाटील व जप्ती पथक प्रमुख कर निधारण व प्रशासकीय अधिकारी राजू पठाण, कर सहायक दत्ताराम म्हाडेश्वर, वसुली कर्मचारी रोहीत परब, मंदार सावंत, केतन पवार, प्रविण कोरगावकर, सतीश जाधव यांच्या पथकाने केली.

error: Content is protected !!