आजगाव मध्ये महिला दिन जोशात

सरपंच यशश्री सौदागर यांचा पुढाकार
आजगाव मध्ये महिला दिन कार्यक्रम जोशात साजरा करण्यात आला ..त्यामध्ये पती मृत्यू नंतर कुटुंब खंबीरपणे चालवून कष्टाने आपल्या मुलांचे शिक्षण ,करिअर घडविणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला ,तसेच आजगाव गावातील प्रत्येक घरी जाऊन ज्या सेवा देतात त्या आरोग्य मदतनीस ,अंगणवाडी मदतनीस ,आशाताई ,पोलिस पाटील महिला ,ग्रामसखी अशा एकूण नऊ नवदुर्गा यांचा सन्मान भेट वस्तू देऊन करण्यात आला
सरपंच यशश्री सौदागर यांच्या पुढाकाराने. हा कार्यक्रम संपन्न झाला.
आजगाव विभागमधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद महिला सदस्य आणि पंचायत समिती महिला सदस्य यांचा ही साडी ,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी उत्स्फूर्त वतृत्व स्पर्धा ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली .. ज्या मध्ये एका ट्रे मध्ये चिट्टी ठेवण्यात आल्या ,ती उचलून त्यात जो विषय दिलेला असेल त्यावर on the spot .. 5 मिनिटे गावातील महिलांनी बोलायचे ,यात कोणत्याही पदावर असणाऱ्या ,नोकरी करणाऱ्या अनुभवी महिलांनी सहभाग घ्यायचा नव्हता ,फक्त सर्वसामान्य महिला .. विषय होते ..
1.मी गावात निवडणुकीत सरपंच अथवा सदस्य म्हणून निवडून आले तर काय विकास करेन
2.माझ्या आयुष्यातील असा कठीण प्रसंग ज्यातून मी हिमतीने मार्ग काढून कुटुंबाला ,घराला आणि स्वतः ला मजबुत बनविले
3.माझ्या आयुष्यात मी दुसऱ्या
व्यक्तीला मदत करून त्या व्यक्तीला कठीण प्रसंगातून सावरले असा मला समाधान देणारा प्रसंग ,घटना .. मदत केलेल्या व्यक्तीचे नाव ,ओळख उघड न करता सांगणे
4माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले रहावे या साठी मी काय करते
5.मोबाईल चांगला की वाईट ..आणि चांगला का .. वाईट का ..आणि त्याचा योग्य उपयोग कसा करावा असे मला वाटते
6.गावच्या विकासासाठी महिलांनी काय केले पाहिजे असे मला वाटते
7.महिला नी प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजिका बनावे यासाठी गावाने ,ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी काय मदत करावी असे मला वाटते ,आणि मी यशस्वी उद्योजिका होण्यासाठी काय करेन
महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला , एकूण 5नंबर आणि 2उत्तेजनार्थ असे नंबर काढण्यात आले
या नंतर संगीत खुर्ची आणि ज्या वयस्क महिला धावू शकत नाहीत त्यांना संगीत पासिंग बॉल खुर्चीत बसून खेळ घेण्यात आले ..या मध्ये 3 नंबर काढले .
प्रथम क्रमांक .. 3लिटर कुकर
द्वितीय क्रमांक .. इलेक्ट्रिक पाणी , चहा बनविण्याची किटली
तृतीय ..पदार्थ गरम राहणारा थर्मास
चौथा ..दूध तापविण्याचा कुकर 1लिटर चा
पाचवा ..स्टील चे duble layer चे चहा 6कप चा सेट
उत्तेजनार्थ .. बासमती तांदूळ 2kg packet
दुपारी 3ते सायंकाळी 6.30पर्यंत कार्यक्रम वेळ होता .
दुपारी 3.30वाजता कोल्ड ड्रिंक आणि सायंकाळी 5.30वाजता समोसा आणि चहा अल्पोपहार देण्यात आला .





