सिंधु चषक २०२६ चा विजेता पंचक्रोशी जामसंडे

कोळोशी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, सिंधुपुत्र कोळोशी उपविजेता

  सिंधुपुत्र प्रतिष्ठान कोळोशी आयोजित सिंधुचषक २०२६ कबड्डी स्पर्धेत दमदार खेळ करत अंतिम सामन्यात सिंधुपुत्र कोळोशी संघाला पराभूत करत जामसंडे पंचक्रोशी संघाने विजेतेपद पटकावत सिंधु चषक उंचावला.या स्पर्धेत मिळालेली बक्षीसाची रक्कम जामसंडे संघाने दिवीजा वृध्दाश्रम असलदे यांना देणगी घोषित करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
   प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या सिंधु चषक २०२६ चा उद्घाटन सोहळा भाजप कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर व जि.प.सदस्य मनोज रावराणे,पं. समिती सदस्या हर्षदा वाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.तर स्पर्धेची नाणेफेक जि.प.सदस्य संतोष पारकर पं. समिती सदस्य अण्णा खाडये यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर,माजी सरपंच सुशील इंदप,सुचिता पोकळे,पंढरी वायंगणकर, संजय गोरुले,विद्याधर खोत, उत्तम सावंत, नामदेव इस्वलकर,राजा साटम,सुयोग पोकळे, सुभाष इंदप, कृष्णा कदम, सिध्दार्थ तांबे,दिपक चव्हाण,विशाल कदम,विशाल पारकर, अमित चव्हाण, अमित इंदप, हरेश सावंत,अजय मेस्त्री, महेश जाधव,ओंकार इंदप,धुळाजी खरात, मयुर राणे, प्रथमेश साळकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील नामवंत संघांचा भरणा असलेली ही स्पर्धा अतिशय रंगतदार ठरली.यामधून अंतिम फेरीत पंचक्रोशी जामसंडे विरुद्ध सिंधुपुत्र प्रतिष्ठापन कोळोशी सामना झाला.या सामन्यात जामसंडे पंचक्रोशी संघाने सांघिक खेळाच्या जोरावर विजेतेपद पटकावले.तर कोळोशी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.तृतीय यंगस्टार कणकवली तर चतुर्थ लक्ष्मीनारायण वालावल ठरले. विजेत्यांस अनुक्रमे रोख रक्कम १२०००,७०००,२५००, व चषक देऊन गौरविण्यात आले. प्रथम, द्वितीय क्रमांक रोख रक्कम संतोषजी पारकर, तृतीय क्रमांक रोख रक्कम हर्षदा वाळके, चतुर्थ रोख रक्कम स्वस्तिक फाऊंडेशन तर सर्व चषक मनोजजी रावराणे यांच्या वतीने देण्यात आले. उत्कृष्ट चढाई ऋषि राणे,पक्कड आकाश पाटकर, अष्टपैलू खेळाडू पंकज सांगळे यांना कै.विजय साळसकर यांच्या स्मरणार्थ कु.प्रथमेश साळसकर यांज कडून रोख रक्कम पारितोषिक देण्यात आले.तर राष्ट्रीय खेळाडू नामदेव इस्वलकर पुरस्कृत पब्लिक हिरो आनंद परब ठरला.या स्पर्धेला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सिंधुपुत्र प्रतिष्ठान कोळोशीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!