नेरुरच्या आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलचा जिल्ह्यात डंका – रुपेश पावसकर

जागतिक महिला दिन आयडियल स्कुलमध्ये साजरा
आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल नेरुरचे नाव सध्या जिल्ह्यात गाजत असून अनेक एकांकिका स्पर्धामध्ये शाळेने उज्वल यश प्राप्त केले आहे. भविष्यात शाळेला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आपण सदैव प्रयत्न करू अशी ग्वाही जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी दिली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल नेरूर येथे महिला पालकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याच्या बक्षीस वितरण प्रसंगी रुपेश पावसकर बोलत होते.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल नेरूर येथे महिला पालकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. अनेक महिला पालकांनी विविध स्पर्धामध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. विशेष आकर्षण असलेल्या खेळ पैठणीच्या या स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पैठणीची मानकरी सौ मेघा अमित राणे ठरली. तर द्वितीय क्रमांक सौ श्रुती स्वप्नील नेरुरकर वर तृतीय क्रमांक सौ मधुश्री वासुदेव नाईक यांना मिळाला. अतिशय उत्साहात महिला पालकांनी संपूर्ण कार्यक्रम साजरा केला. बक्षीस वितरण सोहळा नेरुरचे नूतन जि प सदस्य रुपेश पावसकर, सौ रुद्रा पावसकर व कल्पेश पावसकर यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आला.
यावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल नेरुरचे कौतुक केले. अनेक एकांकिका स्पर्धामध्ये शाळेने उज्वल यश प्राप्त केले आहे. तसेच नुकत्याच सावंतवाडी येथे झालेल्या मालवणी करंडकावर आयडियल स्कूलने आपले नाव कोरले आहे. शाळेची प्रगती पाहून अनेक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेण्यास उत्सुक असल्याचे पावसकर यांनी नमूद केले. तसेच भविष्यात शाळेला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आपण सदैव प्रयत्न करू अशी ग्वाही रुपेश पावसकर यांनी दिली.
स्पर्धेसाठी सर्व बक्षीसे रुपेश पावसकर यांनी पुरस्कृत किली होती. प्राचार्य सौरभ पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता राणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगिता म्हाडदळकर, भूषण सारंग, चैतन्या चव्हाण, भक्ती फोंडेकर, धनश्री मेस्त्री, श्रद्धा गोसावी, प्रतीक्षा दळवी, कीर्ती चव्हाण,करिष्मा खानविलकर, मिलिंद नाईक, वैभव आकेरकर, अपर्णा म्हापणकर यांनी मेहनत घेतली.





