मणिपूर मधील “त्या” घटनेचा ठाकरे गटाच्या महिला आघाडी कडून निषेध!

कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना दिले निवेदन
कुठल्याही जाती-धर्म -देश- राज्याची असली तरी स्त्री हि स्त्रीच असते. आपल्या भारत देशात तर स्त्रीला देवीचे स्वरूप दिले आहे. परंतु सामाजिक द्वेष, हिंसेच्या राजकारणात स्त्रीला नेहमीच टार्गेट केले जात आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे 4,मे 2023 रोजी मणिपूरमध्ये घडलेली पशुला सुद्धा लाजवेल अशी महिलांच्या बाबतीत घडलेली भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारी, निंदनीय नीच लोकांच्या समुदायाने स्त्रीत्वाची काढलेली लांच्छनास्पद धिंड. पंतप्रधानांकडे सर्वच यंत्रणा असताना सुद्धा त्यांना कशी बरं समजली नाही हे अनाकलनीय आहे. 4 मे रोजी घडलेली अत्यंत विकृत लंछनास्पद घटना अलीकडे समाज माध्यमातून संपूर्ण जगासमोर आली तेव्हा सर्वत्र समजली, म्हणजेच ही घटना दडपण्याचा चं हेतू अधोरेखित होतोय. आणि जर असंच घडत असेल तर खरंच या बीजेपीच्या राज्यात महिलांचा सन्मान, आदर ठेवला जातोय का? आत्मनिर्भर भारत घडवत असताना महिलेचा आत्मसन्मान मात्र ठेचला जातोय,आणि म्हणूनच याचा तीव्र निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,महिला आघाडी, सिंधुदुर्ग च्या वतीने केला जात आहे. असे सांगत शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या वतीने कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना निवेदन देण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांकडे निषेध पत्र देताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सिंधुदुर्ग महिला आघाडी प्रमुख सौ. मधुरा श्रीराम पालव, तालुका प्रमुख वैदेही गुडेकर, शैलेश भोगले, उप तालुका प्रमुख भालचंद्र दळवी, युवा सेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, कलमठ ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे, अनुप वारंग, उपशहर प्रमुख दिव्या साळगावकर,धनश्री मेस्त्री,विलास गुडेकर आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी