वन महोत्सव अंतर्गत पाट हायस्कूलमध्ये सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षारोपण

प्रतिनिधी । कुडाळ : पाट हायस्कूलमध्ये हरित सेनेमार्फत विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात यासाठी सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग यांचा मोठा सहभाग असतो. या उपक्रमांमधून वृक्षांचे जतन वृक्षांचे संवर्धन त्याचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविले जाते. पाट स्कूलमध्ये रानभाजी मेळावा, जैवविविधता मेळावा, वन्यजीव सप्ताह, पक्षी निरीक्षण, वृक्षांची लागवड, चित्रकला स्पर्धा , वन्यजीव पोस्टर्स स्पर्धा, वृक्ष दिंडी, भाजीपाला लागवड असे विविध उपक्रम वर्षभर घेतले जातात.
त्याचाच एक भाग म्हणून वनपाल सुनील सावंत यांनी भेट दिली मुलांना विविध व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक शामराव कोरे यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व समजावून सांगितले. तर हरित सेना प्रमुख संदीप साळसकर यांनी वृक्षाचे फायदे औषधी वनस्पतीचे महत्त्व याबाबत माहिती दिली. शाळेच्या परिसरात सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी वनपाल सुनील सावंत यांनीही वनांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक राजन हंजनकर यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.