अधिवेशन संपल्यावर शिक्षण मंत्री दादा भुसे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार

शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी घेतली मुंबई येथे भेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागातील कारभाराबाबत शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्याकडे आढावा बैठक घेण्यासंदर्भात मागणी करण्यात आली.अधिवेशन संपल्यावर या प्रश्नावर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येण्याचे आश्वासन दिले. अशी माहिती श्री आंग्रे यांनी दिली. यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले उपनेते संजय आग्रे, संदेश पटेल उपस्थित होते.





