कणकवलीतील आरोग्य तपासणी शिबिर ठरले झेवियर साठी वरदान

मुंबईत यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते शिबिर

सावंतवाडी येथे होणाऱ्या शिबिराचा लाभ घेण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांचे आवाहन

कणकवली येथील पार पडलेल्या मेगा कॅम्प मध्ये करण्यात आलेली आरोग्य तपासणी एका बालकासाठी जीवनदान देणारी ठरली आहे. नुकताच पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभाग यांच्यामार्फत कणकवली येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये 66 बालकांची तपासणी करण्यात आली शिबिरामध्ये करण्यात आलेल्या ‘२डी इको’ चाचणी दरम्यान कु झेवियर फर्नांडिस राहणार देवबाग तालुका मालवण या 9 वर्षीय मुलाच्या हृदयात दोष असल्याचे निदान झाले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, या मुलाला पुढील उपचार व शस्त्रक्रिया करणेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत सामंजस्य करार झालेल्या रुग्णालयात मुंबई येथे संदर्भित करणेत आले. सदर बालकावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पडली आहे.
तसेच दिनांक 24 मार्च 2026 रोजी उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे मेगा कँप आयोजित करणेत आला असून सदर मेगा कँप मध्ये किम्स हॉस्पिटल ठाणे येथून तज्ज्ञ डॉक्टर यांची टीम उपस्थित राहणार असून 0 ते 18 वर्षे वयोगटात बालकांची 2D इको तपासणी करण्यात येणार आहे . तरी शिबिराचा जास्तीत लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग आरोग्य विभागा मार्फत केले आहे.

error: Content is protected !!