कोरो इंडिया आयोजित जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत बुरंबावडे शिवशक्ती महिला कबड्डी संघाला अजिंक्यपद

बुरंबावडे पश्चिम विभाग विकास मंडळाकडून महिला कबड्डी संघाचा करण्यात आला सत्कार
अलीकडेच कोरो इंडिया आयोजित जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत देवगड तालुक्यातील बुरंबावडे गावातील शिवशक्ती महिला कबड्डी संघाने स्पर्धेत सहभागी झालेल्या २३ संघातून अजिंक्यपद प्राप्त केले. संघाच्या या स्तुत्य कर्तृत्वासाठी या संघाचा बुरंबावडे पश्चिम विभाग विकास मंडळ यांच्यावतीने जागतिक महिला दिनी अवचित्यपूर्वक सन्मान करण्यात आला.
बुरंबावडे गावातून प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवशक्ती महिला कबड्डी संघाच्या मानसी महेश दुदवडकर ( कर्णधार),भक्ती प्रणय पाटणकर, साक्षी सुरेश मांजरेकर, सृष्टी संदीप बांदिवडेकर,गौरी संजय ताम्हणकर,सानिका सचिन राणे, समिधा संदीप वाळवे, नीलिमा सुनील ताम्हणकर, जयश्री अनंत पाटणकर (आजी), प्राजक्ता अजय ताम्हणकर या सर्व महिला खेळाडूंचे कोरो इंडिया आयोजित जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे अंतिम विजेतेपद यशस्वीपणे मिळविण्यात योगदान आहे. या महिला खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. या संघाची निवड मुंबई येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेली असून बुरंबावडे गावातील मिलिंद बांदिवडेकर, प्रणय शंतनू बांदिवडेकर, सत्यवान नार्वेकर, सुनील पाटणकर, दीपक पाटणकर, अनिल जाधव, संदेश मांजरेकर, रघुनाथ जाधव यांनी महिला संघाला पुढील वाटचालीसाठी व्यक्तिगत सदिच्छापूर्वक अर्थसहाय्य केलेले आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकून आल्यावर या विजेत्या महिला संघाचे बुरंबावडे गावात बुरंबावडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने मंडळाचे ग्रामीण अध्यक्ष संदेश मांजरेकर, सचिव उदय दुदवडकर, खजिनदार निलेश हिर्लेकर, बुरंबावडे पश्चिम विभाग विकास मंडळाचे ग्रामीण अध्यक्ष संदीप बांदिवडेकर, खजिनदार राजेंद्र दुदवडकर तसेच बहुसंख्य ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत अभिनंदनपर सुस्वागत करण्यात आले. या जिल्हास्तरीय अंतिम विजेत्या संघातील सर्व महिला खेळाडूंचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुरंबावडे पश्चिम विभाग विकास मंडळाच्या वतीने सर्व खेळाडूंना प्रत्येकी सन्मानपत्र प्रदान करून सदिच्छापूर्वक गौरव करण्यात आला.





