कणकवली नगरपंचायतची स्वच्छता मोहीम सुरू असताना पटवर्धन चौकात मात्र कचऱ्याचे ढीग

सातत्याने कचऱ्याचे ढीग साचत असल्याने यावर कारवाई कोण करणार?
कणकवली शहराच्या मुख्य भागातच ही स्थिती
एकीकडे कणकवली शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू असताना कणकवली शहरात भर पटवर्धन चौकात कचऱ्याचे साचलेले ढीग याकडे मात्र नगरपंचायतचे दुर्लक्ष होत आहे. गेले अनेक दिवस कणकवली पटवर्धन चौक फ्लाय ओव्हर ब्रिज खाली कचऱ्याचे साचलेले ढीग हे शहरातील स्वच्छता मोहिमेचा पोलखोल करणारे ठरत आहेत. त्यामुळे केवळ फोटोसेशन पुरती स्वच्छता मोहीम न राबवता कणकवली नगरपंचायत प्रशासनाकडून अशा ठिकाणचा कचरा सातत्याने साफ करण्यावर भर द्यावा अशी देखील मागणी कणकवली शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.





