निवळीत भरणार चाकरमान्यांसाठी विशेष ग्रामसभा !

सरपंच दैवत पवार यांचा पुढाकार

नोकरी निमित्त बाहेर असणाऱ्यांनाही गावाच्या विकासात योगदान देण्याची मिळणार संधी

गाव विकास समितीचे गाव विकासाचे व्हिजन अंमलात आणणार !

ब्युरो । संगमेश्वर : गावाच्या विकासात तरुणांचे योगदान वाढावे या हेतूने गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी गावांच्या विकासाचे जे व्हिजन त्यांच्या नेहमीच्या भूमिकातून मांडले आहे, त्याला अनुसरून निवळी गावातून शहरात स्थलांतरित झालेल्या चाकरमान्यांच्या विकासाच्या संकल्पना ग्रामपंचायत मध्ये मांडण्यासाठी व लोकांच्या सहभागातून गावाचा विकास साधण्यासाठी चाकरमान्यांसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचा निर्णय निवळी ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून घेतल्याचे दैवत पवार यांनी सांगितले.
याबाबत बोलताना निवळी गावचे सरपंच दैवत पवार म्हणाले की,गावातून शिक्षण घेऊन मुंबई, पुणे,सांगली किंवा अन्य शहरात गेलेले तरुण-तरुणी यांना गावाच्या विकासाबाबत आपले व्हिजन मांडता यावे, विकासाबाबत आपल्या नवीन संकल्पना मांडता याव्यात, त्यांच्या सहभागातून गावाचा सर्वांगीण विकास साधता यावा.यासाठी सर्व चाकरमान्यांच्या सोयीने ग्रामसभा गावांमध्ये लावून त्यांचाही विचार गावाच्या विकासात गृहीत धरला जावा अशा सूचना गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी संघटनेचा एक कार्यकर्ता व सुशिक्षित सरपंच म्हणून मला केल्या होत्या या सूचनांचा विचार करून जनतेच्या हितासाठी व येथून स्थलांतरित झालेल्या तरुणांच्या गावाबद्दलच्या विकासाच्या संकल्पना समजून घेण्यासाठी सरपंच म्हणून चाकरमान्यांसाठी मे महिना किंवा गणपती उत्सव यापैकी चाकरमानी लोकांना योग्य वाटेल त्या दिवशी चाकरमान्यांसाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचा उपक्रम निवळी ग्रामपंचायत मार्फत राबवण्याचा निर्णय मी घेतला असल्याचे सरपंच दैवत पवार यांनी सांगितले.
नियमितच्या ग्रामसभेत गावातील मतदार असणाऱ्यांनाच आपले विचार मांडण्याची संधी मिळत असते मात्र या विशेष ग्रामसभेत गावातून कामानिमित्त बाहेर गेलेले पण त्यांना गावाच्या विकासाची जाण आहे त्या गावाचे मतदार असणारे व मतदार नसणारे या सर्वांना यासभेत त्यांचे व्हिजन मांडता येईल असे दैवत पवार म्हणाले.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, संगमेश्वर.

error: Content is protected !!