क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज मुंबई तर्फे रविवार 15 मार्च रोजी महिला मेळावा व स्नेहसंमेलन

मुंबई महानगरपालिका उपमहापौर संजय घाडी यांची प्रमुख उपस्थिती
जागतिक महिला दिनानिमित्त क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज मुंबई तर्फे रविवार 15 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता पुष्पा पार्क महानगरपालिका शाळा मालाड पूर्व येथे वार्षिक स्नेहसंमेलन व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिका उपमहापौर संजय घाडी, शिवसेना उपनेत्या सौ संजना संजय घाडी ,क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज मुंबई महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष घनश्याम गावकर सरचिटणीस गजानन घाडीगावकर ,माजी अध्यक्ष मुंबई अनंत घाडी, सहचिटणीस मध्यवर्ती विभाग सौ रश्मी घाडीगावकर, मध्यमुंबई विभाग खजिनदार दर्शना घाडी आदी उपस्थित राहणार आहेत .अधिक माहितीसाठी 9819059330/9405371586 या नंबरवर संपर्क साधावा.
तरी या कार्यक्रमासाठी घाडीगावकर समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.





