सन २०२३ या वर्षातील दुसरे राष्ट्रीय लोकअदालत रविवार दिनांक ३० माहे एप्रिल २०२३ रोजी.
सिंधुदुर्ग : माननीय नामदार सर्वोच्च न्यायालय नवीदिल्ली व माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ठरवुन दिलेल्या शेड्युल नुसार सन २०२३ या वर्षातील दुसरे राष्ट्रीय लोकअदालत रविवार दिनांक ३० माहे एप्रिल २०२३ रोजी संपुर्ण देशभरातील न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग सन्माननीय श्री. संजय भारुका साहेब यांनी असे आवाहन केले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या न्यायालयीन खटल्यांची प्रकरणे ज्यामध्ये तडजोडीने निकाली होवु शकतात अशी प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ठेवावीत व कायमस्वरूपी वादाला पुर्णविराम द्यावा. पक्षकारांनी भविष्यातील आपापसात सामंजस्य राहाण्याचे दृष्टीकोनातून जीवन जगण्यासाठी तडजोड हाच एकमेव मार्ग आहे हे ओळखून या राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले. कारण क्षुल्लक वादातुन भयंकर मोठे गुन्हे घडतात आणि त्याचे दुष्परिणाम भावी पिढीला भोगावे लागतात. हे घडु नये हाच आमचा प्रयत्न आहे असेही सांगितले.
राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ देशभरातील अनेक लोक घेत आहेत हे ओळखून वर्षाला चार राष्ट्रीय लोकअदालत, दरवर्षी मोबाईल लोकअदालत मोबाईल व्हॅन द्वारे गावागावात जाऊन केले जाते ही नामदार सर्वोच्च न्यायालय व माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी उपलब्ध करून दिलेली सेवा आहे. प्रत्येक राष्ट्रीय लोकअदालत मध्ये केसीस मोठ्या प्रमाणात निकाली होत आहेत. धनादेश अनादरीत प्रकरणे, सरकारने भुसंपादन करताना मागणी केलेली मोबदल्याची प्रकरणे, पती-पत्नी मधील पोटगी साठी दाखल प्रकरणे किंवा घटस्फोट साठी दाखल प्रकरणे, फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, वसुलीसाठी दाखल केलेली दरखास्त प्रकरणे, घराचे वाटपासाठी प्रलंबित अंतिम निवाडा अर्ज, दिवाणी दावे ज्यामध्ये वडिलोपार्जित जमीन वाटपासाठी दाखल केलेली दिवाणी प्रकरणे, सरकारी दावे, बँकेचे दावे, मोटर अपघात क्लेमची प्रकरणे व सामंजस्याने तडजोड होवु शकतील अशी प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ठेवावीत व झटपट न्यायाचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. एस. जे. भारुका साहेब अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग व मा. श्री. डी. बी. म्हालटकर, सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / सिंधुदुर्ग