भात खरेदी नोंदणी करिता मुदतवाढ द्या

सातबारावर पिकाची नोंद करण्याकरता संपलेली मुदत वाढवा
शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांची मंत्री योगेश कदम यांच्याकडे मागणी
फोंडाघाट वि. का. स. सेवा सोसायटी लि., फोंडाघाटचे चेअरमन यांनी खरीप हंगामातील भात पिक तसेच आंबा – काजू ई-पिक नोंदी संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत व भात खरेदी नोंदणी (रजिस्ट्रेशन) मुदत वाढ मिळण्याबाबत दिलेले निवेदन माझ्याकडे प्राप्त झाले आहे. सदर प्रकरणाबाबत अर्जदारांनी डी. डी. ई. तथा निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे दिनांक ३०/०१/२०२६ रोजी निवेदन दिलेले असून त्यास अनुसरून जा. क्र. कुवशा/डेस्क-४/ ई-पिक पाहणी/कावी-१७/२०२६/१३९४ दिनांक ३०/०१/२०२६ चे पत्र प्राप्त झालेले आहे. सदर प्रकरणाबाबत मान. उपसचिव (पणन), पणन विभाग, मंत्रालय मुंबई तसेच मान. जमाबंदी आयुक्त व संचालक भुमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडेही बाब निदर्शनास आणून देण्यात आलेली आहे. अद्याप या संदर्भात ठोस निर्णय झालेला नसल्यामुळे परिसरातील शेतकरी आपले धान्य (भात पिक) विक्री करू शकलेले नाहीत व त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. ई-पिक नोंद करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या ७/१२ उतान्यावर आंबा, काजू व भात पिकांची नोंद होऊ शकलेली नाही. तसेच भात खरेदी नोंदणीची मुदत दिनांक ३१/०१/२०२६ रोजी संपलेली असून त्यास अद्याप मुदतवाढ मिळालेली नाही. म्हणून परिसरातील शेतकन्यांच्या हिताचा विचार करून शासनाच्या आदेशानुसार तयार केलेल्या पंचयाद्यांप्रमाणे शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर आंबा, काजू व भात पिकांची नोंद त्वरीत करून देण्यात
यावी. तसेच भात खरेदी नोंदणी (रजिस्ट्रेशन) मुदतीस योग्य ती मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी मंत्री योगेश कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याबाबत मंत्री श्री. कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे श्री. आंग्रे यांनी सांगितले.





