कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १८५ रुग्णांच्या मणक्याची मोफत तपासणी

दि स्पाईन फाऊंडेशन मुंबई, उपजिल्हा रूग्णालय कणकवली व डॉक्टर्स फ्रायडे क्लब यांच्यावतीने आयोजन
15 रुग्णांच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला
दि स्पाईन फाऊंडेशन मुंबई उपजिल्हा रूग्णालय कणकवली व डॉक्टर्स फ्रायडे क्लब, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच ग्रामीण भागातील १८५ रुग्णांच्या मणक्याची मोफत तपासणी शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले. ग्रामीण किंवा आदिवासी पाड्यातील मणक्याच्या आजारासंबंधीत अचूक निदान व योग्य मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने दि स्पाईन फाऊंडेशन ही संस्था गेली ३० वर्षे असे उपक्रम राबवत आहे. मणक्याच्या शस्त्रक्रिया या सहसा मोठ्या शहरांमध्ये केल्या जातात. त्याचबरोबर त्या तशा खर्चीकही असतात. साधारणतः एका मणक्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च कमीत कमी ८ ते ९ लाख येवू शकतो. हा खर्च आपल्या शेतीप्रधान देशातील लोकांना न पेलण्यासारखा असतो आणि हीच सुविधा अतिदुर्गम भागातील व गरीबीतल्या रूग्णांना मोफत मिळावी या उद्देशाने डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली दि स्पाईन फाऊंडेशन काम करत आहे. या टिममध्ये जवळपास ५० स्पाईन सर्जन आहेत. कणकवली येथील शिबीराची जबाबदारी कणकवलीचे सुपूत्र डॉ. प्रणित प्रकाश पावसकर, MS स्पाईन सर्जन व डॉ. धनंजय रासम, सर्वेश तायशेटे यांच्याजवळ आहे.
कणकवली येथे शिबीरामध्ये झालेल्या १८५ रूग्णांच्या मणक्याची (मान, कंबर) तपासणी करण्यात आली. गरजेनुसार त्यांना एक्स-रे व औषध पुरवठा करण्यात आला. सदर शिबीरामध्ये १५ रूग्णांना मणक्याचा शस्त्रक्रियांचा सल्ला देण्यात आलेला आहे. तसेच चार रुग्णांना पेन ब्लॉक देण्यात येणार आहेत. शिबीरातील ५४ रूग्णांना MRI चाचणी सुचविण्यात आले असून त्यानंतर त्यांच्या शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मणक्याच्या शस्त्रक्रिया (ऑपरेशन्स) या २७ व २८ मार्च २०२६ रोजी उपजिल्हा रूग्णालय कणकवली येथे करण्यात येणार आहेत. शिबीरासाठी दि स्पाईन फाऊंडेशनचे निष्णात स्पाईन सर्जन डॉ. आदित्य काशिकर, डॉ. निशाद सुतूप, डॉ. प्रणित पावसकर, डॉ. नील ओरा, कोल्हापूर टिममधून डॉ. रवी पटेल, डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ. गुप्ता त्याचबरोबर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलीमा इनामदार, डॉ. विशाल रेड्डी, डॉ. पंकज पाटील, डॉ. आर. एस्. कुलकर्णी, अशोक करंबेळकर ज्येष्ठ पत्रकार, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. सुहास पावसकर, डॉ. धनंजय रासम, डॉ. सर्वेश तायशेटे, डॉ. वृषाली जाधव कणकवली उपजिल्हा रूग्णालयातील फार्मासिस्ट प्रिती कोरगांवकर, सोनिया तेली, कविता राऊळ, श्रीमती मसुरकर, अशोक नारकर, किसन ढोमरे, वैभव पाले, श्री. काजरेकर, वंदना चव्हाण, संचिता चव्हाण, सी.आर. सावंत, एम.एस. पवार, नितीका सावंत इतर सर्व नर्सिंग स्टाफ यांनी विशेष परीश्रम घेतले. ‘वागद बचाव कच्छ गुजरात’ येथे सर्जरी शिबीर. ‘कोकण महाराष्ट्र, उपजिल्हा रुग्णालय कणकवली’ येथे तपासणी शिबीर ‘कर्नाटक, सारगुर ट्रिबल’ येथे सर्जरी शिबीर अशा तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये सर्जरी आणि पिकअप कॅम्प राबविण्यात आले.





