महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण शैक्षणिक दर्जा यावर काम करणार!

जि. प. सदस्य सुप्रिया मेस्त्री यांचे प्रतिपादन
विधवा प्रथा विरोधी भूमिकेला कलमठ मधील महिलांचे मोठे समर्थन
पाककला स्पर्धेचा निकाल जाहीर
कलमठ ग्रामपंचायत वतीने महिला दिनाच्या निमित्ताने महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या महिला ग्रामसभेचे अध्यक्षपद मान सरपंच संदीप मेस्त्री यांनी गेली अनेक वर्षे कलमठ ग्रामसभेला कायम उपस्थित असणाऱ्या ८७ वर्षाच्या सुमती चिंदरकर यांना दिला. कलमठ ग्रामपंचायतने घेतलेल्या विधवा प्रथा विरोधी भूमिकेला उपस्थित महिलांनी हात उंचावून पाठिंबा देत आज सर्वानुमते निर्णयाचा ठराव संमत करण्यात आला.
या निमित्ताने आयोजित पाककला स्पर्धा आणि स्नेह मेळाव्याला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. पाक कला स्पर्धा निकाल
प्रथम क्रमांक नंदिनी मतल
द्वितीय क्रमांक रश्मी मठकर
तृतीय चैत्राली कांबळी
उत्तेजनार्थ शिवन्या पोयेकर.
सर्वांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.
उपस्थित महिलांच्या वतीने यावेळी नवनिर्वाचित जिल्हापरिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री , पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच संदीप मेस्त्री , पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर , सदस्या स्वाती नारकर, तनिष्का लोकरे ,इफत शेख, प्रियाली आचरेकर , हेलन कांबळे,माजी उपसरपंच विनिता बुचडे,माधवी काकडे , सीआरपी अभिलाषा शिंदे, समीक्षा नांदगावकर ,सुनीता लाड, अनिता साळगावकर ,मुख्याध्यापक मधुरा सावंत , निधी करंजकर , सुप्रिया पाटील , समीक्षा चिंदरकर , स्वच्छता मिशनचे नम्रता कुडाळकर मॅडम , उमेद अधिकारी श्री परब , अंकित राणे , ज्योती अमदोसकर, अण्णा सावंत ,खुशाल कोरगावकर , गणेश सावंत , रमेश चव्हाण उपस्थित होते .
स्पर्धेचे परिक्षण श्री गौरव मुंज यांनी केले तर सूत्र संचालन आणि आभार तनिष्का लोकरे यांनी केले.





