ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश

तिसरीतील अलिशा इसप देशात 38 वी व कु. समर्थ ठाकूर देशात 50 वा
नुकत्याच घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल संपादन केले आहे. भविष्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी होण्याच्या दृष्टीने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा ही अत्यंत उपयुक्त अशी परीक्षा आहे. या परीक्षेला प्रशालेतील सुमारे 52 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेमध्ये प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये इयत्ता तिसरीतील कुमारी अलीशा इसप हिने सुवर्णपदकासह देशात 38 वा क्रमांक पटकावला व इयत्ता तिसरीतील कुमार समर्थ ठाकूर याने सुवर्णपदकासह देशात 50 वा क्रमांक पटकावला. तसेच सुमारे 31 विद्यार्थ्यांना रोप्यपदकं व कांस्यपदकं प्राप्त झाली. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेमध्ये विशेष मार्गदर्शन केले जाते. याचाच परिणाम म्हणून हे उज्वल यश विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहे अशी भावना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय सानप यांनी व्यक्त केली. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षिका सौ. दर्पे मॅडम, सौ. शर्मिन काझी मॅडम, सौ. अदिती गुरव मॅडम, पुनम गुरव मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, सर्व संचालक मंडळ, पालक यांनी विशेष अभिनंदन केले आहे.





